देशाचे स्वयंशिस्त नागरिक बना : बर्गे

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 12 -महाविद्यालयीन दिवस पुन्हा येत नसतात. त्यामुळे विद्यार्थांनी मस्ती करावी; पण हे करीत असताना त्यास बेशिस्तीचे कुठेही वंगण नसावे, असे सांगत सहायक पोलीस आयुक्‍त भानुप्रताप बर्गे यांनी विद्यार्थ्यांना देशाचे स्वयंशिस्त नागरिक बना, असा सल्ला दिला.

एच.व्ही. देसाई महाविद्यालयातील प्रथम वर्ष बीएस्सी. संगणक शास्र, बीसीए. (सायन्स), बीबीए व एम.एस्सी. संगणक शास्त्राच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ बर्गे यांच्या उपस्थितीत पार पडला. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. ए. पी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी अभिजित पवारसह आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भानुप्रताप बर्गे यांनी विद्यार्थ्यांना वास्तवदर्शी उदाहरणे देत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना युवक व युवती कसे भरकटत जातात, आई वडिलांचा मान सन्मान विसरतात, इतरांच्या खोट्या भूलथापांना बळी पडून अवास्तविक व काल्पनिक विश्वाला कसे भुलतात, याची समर्पक उदाहरणे त्यांनी विद्यार्थांना दिली. सोशल मिडीयाचा वापर कसा करावा. कोणत्या गोष्टी शेअर कराव्यात व कोणत्या गोष्टी शेअर करू नयेत याचे महत्व व त्या मागील गांभीर्य पटवून दिले. शिक्षण घेत असताना आपल्या गुरुजनांचा मान राखा. महाविद्यालायाविषयी आत्मियता बाळगा, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रा. कविता खोजे व आभार प्रदर्शन प्रा. शुभदा लिटके यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)