देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणे भाग्याचे – मयंक अग्रवाल

मेलबर्न: भारतीय संघाकडून खेळणे हे सर्वच खेळाडूंचे स्वप्न असते आणि तशी संधी फार कमी जणांना अनुभवायला मिळते. अशी संधी मला मिळाली त्यामुळे मी स्वताःला खुप भाग्यशाली समजतो असे विधान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून सलामीवाराच्या भुमीकेत पदार्पण करणाऱ्या मयंक अग्रवालने केले आहे.

यावेळी बोलताना मयंक म्हणाला की, कसोटी क्रिकेटची टोपी घेतल्यानंतर लागलीच मैदानात उतरलो त्यावेळी एकिकडे स्वप्न पुर्ण झाल्याची भावना होती. तर, दुसरीकडे आपल्या कामगिरीकडे लक्ष देण्याची गरज होती. दोन्ही गोष्टी एकाचवेळी सांभाळणे अवघड झाले होते. तरीही मी प्रयत्नपुर्वक माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत केले आणि स्वताःला सांगत राहिलो की मला मैदानात उतरायचे आहे आणि मला दिलेली कामगिरी पुर्ण करायची आहे. त्यामुळे मी माझ्य खेलावर लक्ष केंद्रित केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी तो पुढे म्हणाला की, मी मैदानात जाण्यापुर्वी संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंनी माझे अभिनंदन करताना सांगितले की, कोणत्याही परिस्थीतीची चिंता न करता आपला खेळ सादर कर आणि मिळालेल्या संधीचे सोने कर असे सांगत माजा उत्साह वाढवला. त्यामुळी मी माझ्या कामगिरीवर आनंदी असून शतक हुकल्याचे कोणतेही दुखः मला नाही.

मयंक अग्रवालहा आपल्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावणार सातवा भारतीय खेळाडू ठरला आहे. तर, ऑस्ट्रेलियन भुमीवर पदार्पणात सर्वात मोठी खेळी करणारा पदार्पणवीर ठरला आहे. यावेळी आपल्या खेळी बद्दल बोलताना तो म्हणाला की, मला माझ्या खेळीणे आनंद झाला मात्र, मला आणखिन धावा करायच्या होत्या. ज्यावेळी मी मैदानावर उतरलो होतो. त्यावेळी मी खेळपट्टी कशी आहे याचा विचार केला नव्हता. माझ्या समोर केवळ खेळपट्टीवर टिकून फलंदाजी करणे हाच एक उद्देश होता. आणि मी तश्‍याच प्रकारे खेळल्याचा मला फायदा झाला.

स्थानिक सामन्यांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतरही मयंकला राष्ट्रीय संघात स्थान मिळवायला वेळ लागला. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला की, मला वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली होती. मात्र, प्रत्यक्षात मला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात सामने होते, तर, भारत अ संघाचे देखिल बरेच दौरे सुरू होते. त्या सर्व ठिकाणी खेळायची मला संधी मिळाली. त्यामुळे एकदिवस राष्ट्रीय संघाकडून पण खेळण्याची संधी मिळेल अशी मला आशा होती. ती ऑस्ट्रेलियातील दौऱ्यात पुर्ण झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)