देशाचा वर्तमान केविलवाना – मकरंद अनासपुरे

पिंपरी – आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. आपलीच संस्कृती जगातील एकमेव संस्कृती अशी, आहे जिथे जनावरे, पाणी, झाडांची पूजा केली जाते. दैदिप्यमान इतिहास असणाऱ्या आपल्या देशाचा वर्तमान केविलवाना असल्याची खंत सिनेअभिनेते व नाम फाउंडेशनचे सदस्य मकरंद अनासपुरे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

अण्णासाहेब मगर सोशल-स्पोर्ट्‌स फाउंडेशनच्या वतीने कामगार कल्याण मैदान येथे रविवार (दि. 18) आयोजित कार्यक्रमात मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब शिंदे यांना प्रदान करण्यात आला. तर माधुरी कुलकर्णी व संजय वाबळे यांना कार्यक्षम नगरसेवक तर कैलास कुटे यांना पिंपरी-चिंचवड युवा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक मधुकर बाबर, कैलास काटे, हास्य सम्राट दीपक देशपांडे, फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष गुलाब बिरदवडे आदी उपस्थित होते.

-Ads-

खडकवासला धरणातीला गाळ काढण्याचे अतुल्य कार्य नाम फाउंडेशन व ग्रीन थिंम्ब यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 21 नोव्हेंबरपासून सुरु होत असल्याची माहिती देत अनासपुरे पुढे म्हणाले की, सोशल मिडिया हा अत्यंत गतिमान झाला आहे. याचा उपयोग सकारात्मकतेने करायला हवा. समाजात अनेक व्यक्ती आपापल्या परीने काम करत असतात. त्यातच खरा रियल हिरो दडलेला असतो. वृक्ष संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी जर एक झाड लावले. तर ते झाड 10 वर्षे टिकू शकते. पाश्चात्यांच्या रितीरिवाजांमुळे नातेसंबंध संपुष्टात येत असून आपली संस्कृती टिकविणे युवकांच्या हाती आहे, असेही त्यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)