देशाचा प्रमुख राजा असावा, व्यापारी नसावा! : राज ठाकरे

राज ठाकरे यांची मोदींवर टिका

मुंबई: गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढीवरून केलेली वक्तव्ये आठवावीत. त्यावेळी इंधन दरवाढीवरून भाजपवाल्यांनीही आंदोलने केली होती, याची आठवण करून देतानाच भाजपा हा कॉंग्रेसपेक्षाही वाईट आहे, असा आरोप करतानाच देशाचा प्रमुचा हा राजा असावा, व्यापारी नसावा अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली.

सायंकाळी आंदोलनाची सांगता झाल्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे यांनी देशाला खड्डयात घातले. आता या चुका सुधारण्यासाठी पुन्हा इंधनदरवाढीच्या माध्यमातून लोकांच्याच खिशात हात घालण्यात येत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.
बंदच्या मुद्यावर कॉंग्रेसची भलामण करायची नव्हती. पण इंधनदरवाढीविरोधात काहीतरी आंदोलन करायचे असा आपला विचार सुरूच होता. त्यामुळे या बंदमध्ये सहभागी होण्याचा आपण निर्णय घेतल्याचे सांगतानाच इंधनदरवाढीच्या मुद्यावर आपण कॉंग्रेससोबत आहोत असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. भाजपा विरोधात सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र यावे अशी आपली भूमिका कायम असल्याचा पुनरूच्चारही त्यांनी यावेळी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)