देशाकडून खेळण्यास नकार देणाऱ्या खेळाडूंची लाज वाटते – हूपर

कोलकाता: पहिल्या टी-20 सामन्यात भारताकडून पाच गड्यांनी पराभूत झालेल्या विंडीजचा माजी कर्णधार कार्ल हूपरने विंडीजच्या स्टार क्रिकेटपटूंवर टिका केली. यावेळी बोलताना हूपर म्हणाला, देशा कडून नाव कमावल्या नंतर देशाच्या संघाकडून खेळण्यास नकार देनाऱ्या खेलाडूंची आम्हाला लाज वाटते. अशी थेट टिका करत त्यने ख्रिस गेल, आंद्रे रसेल आणि सुनिल नारायन या खेलाडूंवर थेट टिका केली आहे.

यावेळी बोलताना तो पुढे म्हणाला की, ही खरोखरच लज्जास्पद गोष्ट आहे की, आमच्या काही अव्वल खेळाडूंना देशाचे प्रतिनिधित्व करण्यात रस राहिलेला नाही, विंडीज बोर्ड आणि खेळाडू हा वाद गेली कित्येक वर्षे सुरू असून त्यामुळे त्यांच्या क्रिकेटचे नुकसान होते आहे. तर काहींनी वैयक्तिक कारण देत भारत न येणे पसंत केले. तर काही खेळाडू जायबंदी असल्याने भारतात आलेले नाहीत. त्यामुळे हे खेलाडू देशाचे प्रतिनिधीत्व करण्यापेक्षा पैशालाच जास्त महत्व देत आहेत अशी बोचरी टिकाही यावेळी हूपरने केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जायबंदी असणे किंवा क्रिकेट बोर्डाशी पटत नाही अशी कारणे देणे म्हणजे ही मंडळी देशासाठी खेळण्यास उत्सुक नाहीत, असेच यातून दिसून येत असल्याचे हूपर या वेळी म्हणाला. विंडीजचा माजी कर्णधार सध्या भारतात भारत विरुद्ध विंडीज मालिकेच्या समालोचनासाठी. सध्या टी-20 मालिकेत भाग घेतलेल्या विंडीज संघाचे नेतृत्व कार्लोस ब्रॅथवेटकडे असून तीन खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पणदेखील करत आहेत. यामध्ये फॅबियन ऍलनचा समावेश आहे.

पहिल्या टी-20मध्ये याच ऍलनने 20 चेंडूत 27 धावा केल्या होत्या. तोच त्या लढती विंडीजचा सर्वोच्च स्कोअर करणारा फलंदाज ठरला होता. आमचे सीनियर फलंदाज असते, तर भारताला लढत जड गेली असती. सध्या विंडीज संघ नवा आहे, त्याला परिपक्व होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, असेही हूपर यावेळी म्हणाले. तसेच यावेळी पुढे बोलताना हूपर म्हणाला की, आम्हाला आमच्या कामगिरीत सातत्य आणावे लागनार आहे. कारन बऱ्याचदा आम्ही सुरुवातीला चांगला खेल सादर करतो. मात्र, नंतर नंतर आमच्या कामगिरीत बदल होत जातो. आणि आमची कामगिरी खराब होत जाते. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये जर आम्हाला विजय मिलवायचा असेल तर आमच्या फलंदाज आणि गोलंदाजांना त्यांची शक्तीस्थाने ओळखून कामगिरी करणे आवश्‍यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)