देशभरात ‘बंद’ला उस्फुर्त प्रतिसाद; अनेक ठिकाणी हिंसेचे गालबोट 

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलसह एलपीजी गॅस सिलिंडरमधील भाववाढीच्या निषेधार्थ तसेच मोदी सरकारच्या फसलेल्या आर्थिक नितीच्या विरोधात कॉंग्रेसने आज भारत बंद पुकारला असून देशातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी त्याला पाठिंबा दिला आहे. सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात येणार आहे. अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे दिल्लीतील रामलीला मैदानावर धरणे आंदोलन देत आहेत.

अनेक पक्षांच्या नेत्यांनी शांततेत बंद करण्याचे आवाहन करूनही अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे. पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी पीएमटी फोडली असून चेंबूरमध्ये बसवर दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. शिवाय देशातील अनेक भागात टायर्स जाळण्याच्याही घटना घडल्या आहेत. मनसे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी ट्रॅकवर उतरत ‘रेलरोको’ आंदोलन केले. दरम्यान, भारत बंदच्या पार्श्वभूमीवर १२ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याने ५०हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

औरंगाबादमध्ये २० पेक्षा अधिक पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. तर दुकाने सुरु ठेवा, परंतु दुकानांसमोर बंदमध्ये सहभागी असल्याच्या पाट्या लावण्याचे आवाहन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नांदेड व्यापाऱ्यांना करत अनोखे आंदोलन केले आहे. उज्जैनमध्ये एका पेट्रोल पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचीही घटना घडली आहे.

देशभरात भारत बंदला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत असला तरी हिंसेचे गालबोट लागल्याचेही दिसून येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)