देशभरातील 43 स्मार्ट सिटींमधील हवा प्रदुषित ; प्रशासनाच्या ढिम्मपणावर केंद्र नाराज

महाराष्ट्रातील 17 शहरांचा समावेश

नवी दिल्ली: देशाच्या राजधानीसह अनेक मेट्रो शहरांमध्ये हवा प्रदूषणाची समस्या भयंकर आहे. मात्र, यावर उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. आश्‍चर्यची बाब म्हणजे यात 43 स्मार्ट सिटींचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, उल्हासनगर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर अशा 17 शहरांची हवा प्रदुषित आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशभरातील हवा प्रदुषित असलेल्या 102 शहरांची यादी केंद्राने चार महिन्यांपूर्वी जाहीर केली होती. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने “राष्ट्रीय स्वच्छ वायू’ उपक्रम हाती घेतला आहे. त्यावेळी या 102 शहरांतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक प्रशासनांनी तातडीने कृती योजना आराखडा सादर करावा, असे सांगण्यात आले आहे.
पुणे, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरातील नायट्रोजन डायऑक्‍साईडचे प्रमाण सर्वाधिक (घातक पातळी) असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले. तर विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर ही सर्वात प्रदूषित शहर आहेत.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रदूषित शहरांची यादी सादर करुनही त्याची गांभीर्याने दखल न घेतली गेल्याबद्दल सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, अमरावती, जालना, कोल्हापूर आणि लातूर या शहरांनी ऍक्‍शन प्लान दिले होते. मात्र ते फेटाळल्यानंतर त्यांचे पुनर्सादरीकरण केले गेले नाही.

केंद्राने निश्‍चित केलेल्या मानकानुसार, “पार्टिक्‍युलेट मॅटर 10′ चं वार्षिक सरासरी प्रमाण 60 आणि नायट्रोजन डॉयऑक्‍साइडचं वार्षिक सरासरी प्रमाण 40 पेक्षा अधिक असल्यास त्या शहरांना प्रदूषित शहर म्हटले जाते.
दरम्यान, महाराष्ट्रानंतर प्रदूषणात उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशातील पंधरा शहर सर्वाधिक प्रदूषित आहेत. तर पंजाबमधील आठ, हिमाचल प्रदेशामधील सात शहरांचा समावेश आहे. गुजरातमधील सूरत, तामिळनाडूमधील तुतीकोरीन, कर्नाटकातील चार आणि आंध्र प्रदेशातील पाच शहरं प्रदूषित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)