देशभरातील शेतकऱ्यांचा दोन दिवसांचा संप

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणांना विरोध करण्यासाठी डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली देशभरातील शेतकऱ्यांच्या संघटनांनी 8 आणि 9 जानेवारी रोजी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. “ऑल इंडिया किसान सभा’ आणि “भूमी अधिकार आंदोलन’ या दोन संघटनांच्या माध्यमातून हा संप पुकारला जाणार आहे.

“ग्रामीण हरताळ’ नावाने होणाऱ्या या संपादरम्यान रेल्वे आणि रस्ते वाहतुकही रोखली जाणार आहे. ग्रामीण भागातील समस्यांचे निराकरण करण्यात केंद्रातील सरकारला आलेले अपयश, शेतकऱ्यांच्या जमिनी कॉर्पोरेट कंपन्यांपासून वाचवने आदी मुख्य मुद्दे या संपादरम्यान उपस्थित केले जाणार आहेत, असे “मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी’शी संबंधित ऑल इंडिया किसान सभाचे सरचिटणीस हनान मुल्ला यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून झालेल्या भ्रमनिरासाचा आणि कृषी विषयी त्यांच्या धोरणांचा निषेध नोंदवण्यासाठी या संपादरम्यान देशभर निदर्शने, आंदोलन, निषेध सभा आयोजित केल्या जाणार आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये देशभरातील शेतकऱ्यांनी संसदेवर मोठा मोर्चा नेला होता. त्याची पुनरावृत्ती या संपादरम्यान होईल, असा विश्‍वास “सिटू’चे सरचिटणीस तपन सेन यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)