देशभरातील शेतकरी घालणार संसदेला घेराव 

मुंबई: कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने येत्या 29 व 30 नोव्हेंबर रोजी देशभरातील शेतकरी संसदेला घेराव घालणार आहेत. या ऐतिहासिक आंदोलनात महाराष्ट्रातून लाखो शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

खासदार राजू शेट्टी यांनी संसदेत मांडलेल्या दोन विधेयकांवर तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, या प्रमुख मागण्या आहेत. खा. राजू शेट्टी यांच्या अथक प्रयत्नातून देशातील शेतकऱ्यांच्या 204 संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रित आल्या आहेत. यातूनच देशपातळीवर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचा जन्म झाला.

-Ads-

शेट्टी आणि समितीच्या नेत्यांनी संपूर्ण देशभर दौरे करून विविध राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचा कर्जबाजारीपणा, देशभरात शेतकऱ्यांचे सुरू असलेले आत्महत्येचे सत्र यामागील कारणे व त्यावरील उपाययोजना याचा अभ्यास करून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती विधेयक 2018′ आणि शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव 2018′ हे दोन विधेयक तयार करून ते लोकसभेत मांडले. या दोन्ही विधेयकावर व शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी समितीने केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)