देशभरातील औषध विक्रेत्यांचा 28 सप्टेंबरला बंद 

मुंबई: देशभरातील औषध विक्रेत्यांनी ऑनलाईन विक्रीविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्यांनी 28 सप्टेंबरला देशव्यापी बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषध विक्रीला परवानगी देऊ नये. तसेच, देशात ई-फार्मसीज्‌ना कुठल्याही स्वरूपात कार्य करू दिले जाऊ नये, अशी मागणी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्टस्‌ आणि ड्रगिस्टने केली आहे.
सरकारने आमच्या आवाहनावर सरकारात्मक विचार केला नाही तर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा त्या संघटनेने दिला आहे. ऑनलाईन विक्रीमुळे औषध विक्रेत्यांचे व्यावसायिक नुकसान होईल. याशिवाय, ऑनलाईन विक्री जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरेल. टेक-सॅव्ही तरूण पिढीचेही मोठे नुकसान होईल, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)