देशप्रेमाचा जागर

पिंपरी – चौकाचौकात ध्वजारोहण…, देशभक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम…, साहित्य वाटप, वृक्षारोपणासारखे सामाजिक उपक्रम… अशा माध्यमातून पिंपरी-चिंचवड कामगारनगरीने 72 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. शहरभर देशभक्तीचे वारे वाहत होते. शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मिळाल्याने पिंपरी-चिंचवडकरांसाठी स्वातंत्र्य दिन खास ठरला. दिमाखदार सोहळ्यात निगडीतील भक्‍ती-शक्‍ती चौकात असलेला देशातील सर्वात मोठा तिरंगा फडकवण्यात आला. हजारो शहरवासियांनी आवर्जून याठिकाणी हजेरी लावली.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपमहापौर सचिन चिंचवडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, इ प्रभाग अध्यक्षा भीमाबाई फुगे, नगरसदस्य राजेंद्र गावडे, राजू मिसाळ, अमित गावडे, केशव घोळवे, राजेंद्र लांडगे, शैलेश मोरे, नगरसदस्या अपर्णा डोके, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहशहर अभियंता आयुब पठाण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय आदी उपस्थित होते.

यशस्वीमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीचे संचलन
चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) मध्ये टिकम शेखावत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लष्कराच्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या वाद्य पथकाने केलेले संचलन विशेष आकर्षण ठरले. यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद मराठे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस, संचालक मकरंद कुलकर्णी, अभिषेक कुलकर्णी, ग्रंथपाल पवन शर्मा आदी उपस्थित होते.

प्रतिभा महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गौरव
चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात पुणे येथील बोरा रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश बोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. यावेळी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, पी. आय. एम.चे संचालक डॉ. सचिन बोरगावे, डॉ. राजेंद्र कांकरीया, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, वनिता कुऱ्हाडे, मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे संचालक डॉ. के. आर. पाटेकर आदी उपस्थित होते. प्रा. वैशाली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुनिता पटनाईक यांनी आभार मानले.

रोटरी क्‍लबतर्फे विशेष मुलांना वह्या
रोटरी क्‍लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे निगडी-प्राधिकरण येथील सुहृदय मंडळ संचलित मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेत रोटरीचे सचिव सुधीर मरळ व फंड रेसिंग डायरेक्‍टर सचिन काळभोर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मांडके, विकास पाटोळे, रोटरी क्‍लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, शेखर चिंचवडे, सुभाष वाल्हेकर, गणेश बोरा, वीरेंद्र केळकर, वसंत ढवळे, स्वाती वाल्हेकर, मारुती उत्तेकर, संदीप वाल्हेकर, अभिषेक वाल्हेकर आदी उपस्थित होते. युवराज वाल्हेकर यांनी संयोजन केले.

प्रेरणा विद्यालयात विद्यार्थ्यांचे संचलन
थेरगाव येथील प्रेरणा शिक्षण संस्थेच्या बालक, प्राथमिक, माध्यमिक व तुकाराम गुजर कनिष्ठ महाविद्यालयात निवृत्त लेफ्टनंट कर्नल जगजितसिंह व संस्थेचे मानद सचिव कांतीलाल गुजर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबध्द संचलनाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. प्रशासन अधिकारी विलास दसाडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, प्राचार्य यशवंत पवार, मुख्याध्यापक सुनिल सोनवणे, प्रेरणा बॅंकेचे संचालक संतोष मुंगसे, सामाजिक कार्यकर्ते अनिल वडघुले आदी उपस्थित होते. उमेश आगम यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अनिल नाईकरे व दत्तात्रय उबाळे यांनी केले. धनसिंग साबळे, अशोक खताळ, अनिल नाईकरे, रमेश कदम, मोहन परहर, ज्ञानेश्वर बोरसे, बिपीन देशमुख, अर्जुन शेटे, दिलीप माळी यांनी संयोजन केले.

पिंपरी रोटरी टाऊनतर्फे रक्‍तदान शिबीर
रोटरी क्‍लब ऑफ पिंपरी टाऊनच्या रोट्रॅक्‍ट क्‍लब ऑफ मॉडर्न महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 50 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. मॉडर्नचे सचिव शरद इनामदार, प्राचार्य सदाशिव शिरगावे, रोटरी क्‍लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे, सचिव महादेव शेंडकर, प्रकल्प अधिकारी गीता जोशी, आनंद सूर्यवंशी, दीनानाथ जोशी, रश्‍मी भावे, रवींद्र भावे, वाल्हेकरवाडी रोटरी क्‍लबचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, स्वाती वाल्हेकर, बाळकृष्ण उऱ्हे, मंदाकिनी भोसले आदी उपस्थित होते. कार्तिकी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. आदित्य रायरीकर यांनी आभार मानले.

प्रियदर्शनीमध्ये विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण
इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मागील 5 वर्षापासून विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. यंदाचा मान शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थी व बाल ट्रेकर मल्हार लांडगे यास मिळाला. त्याचे आई-वडील अनुजा व किरण लांडगे तसेच प्रियदर्शनी स्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सिंग, नवल सिंग, मुख्याध्यापिका अर्पिता मेगेरी, गायत्री जाधव आदी उपस्थित होते. मल्हार लांडगे, अनुजा लांडगे, राजेंद्र सिंग यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शिशु वर्गातील मुलांची भाषणे झाली. योगा, स्व-संरक्षणासाठी कराटे, पिरॅमिड, समूह गीत आणि सामूहिक नृत्यांचे सादरीकरण झाले. यावेळी नवल सिंग यांच्या हस्ते शाळेच्या सायन्स लॅब आणि व्हर्च्युयल रियालिटी लॅबचे उद्‌घाटन करण्यात आले. वंदे मातरम्‌ने कार्यक्रमाची सांगता झाली.

एसकेएफच्या सुरक्षा रक्षकांचे संचलन
एसकेएफ इंडिया लि. या कंपनीच्या प्रांगणात हब युनिटचे व्यवस्थापक राजेंद्र ताटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सुरक्षा अधिकारी भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार आर. एम. मणी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. सुरक्षा रक्षकांचे संचलन झाले. या वेळी एसकेएफ ग्रुप आयटी सेवा व्यवस्थापन प्रमुख जेन वोलमु, विघ्नहरी देव, दत्ता कांबळे, मिलिंद श्रीखंडे, रोहन फडके, हेमंत गाडे, महादेव जगताप, प्रसाद साकुरे, गणेश घाडगे, हमीद मुलाणी आदींसह कामगार उपस्थित होते. एसकेएफ स्पोर्टस अकादमीच्या मैदानावर आंतर विभागीय फुटबॉल स्पर्धांचे आयोजन आणि बक्षीस वितरण झाले. अश्‍फाक शेख यांनी संयोजन केले.

एसकेएफ एम्प्लॉईज युनियनतर्फे ध्वजवंदन
एसकेएफ एम्प्लॉईज युनियनच्या वतीने चिंचवडमधील गावडे कॉलनी येथे संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत लिंगायत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बाळासाहेब शिंदे, सॉलोमन डेव्हिड, संजय तांडेल, अनिल चिंचवडे, साजिद पठाण, किशोर कदम तसेच कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)