देशगद्दारांना हवे कठोर शासन (भाग-१)

उत्तर प्रदेशातील पोलिसांनी पकडलेल्या एका आरोपीकडून मिळालेल्या माहितीतून नागपुरातील संशोधन संस्थेत कार्यरत असणाऱ्या निशांत अग्रवाल या शास्रज्ञाला पाकिस्तान आणि अमेरिकेला ब्राह्मोस क्षेपणास्राविषयीची माहिती दिल्याच्या आरोपावरून नुकतीच अटक करण्यात आली. हा संशयित ब्राह्मोस क्षेपणास्राचे कंपोनंटस्‌ बनवण्यात येत असलेल्या खासगी संस्थेत कार्यरत होता. तो हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा संशय व्यक्‍त केला जात आहे. ज्या हेरांवर गोपनीय व संवेदनशील (क्‍लासिफाईड इन्फर्मेशन) गोळा करण्याचे काम जेव्हा एखादे राष्ट्र सोपवत असते त्यावेळी त्या राष्ट्रातील हेर ज्याच्याकडे सोपवले आहे त्याच्याशीच संपर्क साधत असतात. या संपर्कातून अग्रवालने कोणकोणती आणि किती माहिती पुरवली आहे याचा शोध पोलिसांकडून घेतला जाईल. ब्राह्मोस क्षेपणास्राविषयी इंटरनेटवर आणि अन्य माध्यमातून उपलब्ध असलेली माहिती निशांतने शेअर केली की संवेदनशील माहिती दिली हे या तपासातून पुढे येईल.

देशगद्दारांना हवे कठोर शासन (भाग-२)

डेव्हिड कोलमन हेडली हा अमेरिकेचा हेर 26/11 च्या हल्ल्यापूर्वी मुंबईला येऊन गेला होता. अमेरिकेतून पाकिस्तानला गेला आणि त्याने लष्करे तैय्यबाला सर्व संवेदनशील माहिती पुरवली. परंतु हेडलीला हाफिज सईद आणि झाकीर उल रहमान लकवी हे कोणते अतिरेकी मुंबईवर हल्ला करण्यासाठी पाठवणार आहेत याची कल्पना नव्हती. सांगण्याचे तात्पर्य असे की यासंदर्भात अत्यंत गोपनीयता बाळगली जात असते. त्यादृष्टीने निशांत अग्रवालला पकडण्यात आलेले यश उल्लेखनीय आहे. आता प्रश्‍न उरतो तो त्याच्यावर कठोर कारवाई करता येईल का हा.

– अॅड. उज्ज्वल निकम


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)