देशगद्दारांना हवे कठोर शासन (भाग-२)

देशगद्दारांना हवे कठोर शासन (भाग-१)

एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, हेरगिरी हादेखील युद्धनीतीचाच एक भाग आहे. त्यामुळे देशाशी गद्दारी करणाऱ्या अशा बदमाशांवरील खटले भारतीय दंड विधानाअंतर्गत चालवण्याऐवजी आर्मी ऍक्‍ट अंतर्गत चालवले गेले पाहिजेत. तशी तरतूद केली गेली पाहिजे. कारण देशाची संरक्षणव्यवस्था अभेद्य असणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्याला सुरुंग लावून केवळ पैशांच्या अथवा शरीरसुखाच्या मोहात अडकून संवेदनशील आणि गोपनीय माहिती लीक करत असेल तर तो अक्षम्य गुन्हा आहे. आपल्याच दुतावासातील एक महिला पाकिस्तानात असताना तिथल्या आयएसआय अधिकाऱ्याच्या प्रेमात पडली होती. तिला किरकोळ शिक्षा झाली होती. असे घडता कामा नये. यासाठी आपल्याला कायद्यात दुरुस्ती करावी लागेल. विशेष लष्करी न्यायालये स्थापन करून अशा गुन्ह्यांना कठोर शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे. तरच पुढच्यास ठेच मागचा शहाणा या तत्त्वानुसार भविष्यात देशाशी अशा प्रकारची गद्दारी करण्याची हिंमत करण्यास कुणीही धजावणार नाही. अलीकडेच इंटरपोल प्रमुखाला चीनने डांबून ठेवल्याची घटना समोर आली. हा प्रमुख एके काळी चिनी पोलीस दलात होता. त्याने भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून चीनने त्याला शिक्षा करणार असल्याचे जगाला सांगितले. देशगद्दारांविरुद्ध अशा प्रकारची कठोर पावले उचलल्याखेरीज या घटनांना आळा बसणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सद्यस्थितीत सरकारी गोपनीय माहिती उघड केली जात असेल अथवा दुसऱ्याला विकली जात असेल तर ऑफिशियल सिक्रेट ऍक्‍ट अंतर्गत कारवाई केली जाते. जर अशी माहिती दहशतवाद्यांना दिली जात असेल तर अनलॉफुल ऍक्‍टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्‍टनुसार कारवाई केली जाते. याखेरीज भारतीय दंड विधानातील तरतुदींनुसारही कारवाई करता येते. पण या परंपरागत कायद्यांनी आणि मार्गांनी होणाऱ्या कायदेशीर प्रक्रियेला बराच वेळ लागू शकतो. त्यातून शिक्षेचा हेतू कितपत साध्य होईल हा प्रश्‍न उरतोच. म्हणूनच आपल्या देशाच्या संरक्षणाविषयीची,सुरक्षिततेविषयीची माहिती वैयक्‍तिक स्वार्थापोटी हेतूपुरस्सर जर शत्रूला विकली वा दिली जात असेल तर त्यांना कठोर शासन होणे आवश्‍यक आहे. जेणे करून अशा प्रकारचे देशद्रोही कृत्य करणाऱ्यांच्या उरात धडकी भरेल

– अॅड. उज्ज्वल निकम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)