देव त्यांना बुद्धी देवो -सुधीर मुनगंटीवार

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघडकीस आणून सरकारला चांगलेच पिंज-यात पकडले. मंत्रालयातील ३ लाख १९ हजार ४०० उंदीर सात दिवसांत कसे मारण्यात आले, असा सवाल खडसेंनी विधानसभेत केला होता. याचे प्रत्युत्तर देताना देव त्यांना सुबुद्धी देवो असे म्हणत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खडसेंना उपरोधात्मक टोला हाणला आहे. त्यामुळे आता भाजपाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्येच उत्तर आणि प्रत्युत्तरांची लढाई सुरु झाल्याचे दिसत आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी उंदीर घोटाळ्यावरुन खडसेंचे कान टोचले. ते म्हणाले की, प्रत्येक गोळी खाऊन उंदीर मेला असा अर्थ काढणे चुकीचे आहे. देव त्यांना बुद्धी देवो असे म्हणत नाव न घेता त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते पुढे म्हणाले की, चुकीचा अर्थ काढून घोटाळ्याचा उल्लेख केला आहे. प्रत्येक गोळी खाऊन उंदीर मेला असे म्हणने चुकीचे आहे. मुनगंटीवार यांच्या या विधानाला खडसे काय उत्तर देतात हे पाहण औस्तुक्याचे ठरणार आहे.

मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाल्याने आधी उंदरांची संख्या मोजण्यात आली. ती चक्क ३ लाख १९ हजार ४०० भरली. सहा महिन्यांत या उंदरांचा ‘बंदोबस्त’ करण्याचे ठरविले. प्रत्यक्षात कंत्राटदारास कार्यादेश देताना दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आणि कंत्राटदाराने ही मोहीम अवघ्या सात दिवसांत फत्ते केली, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)