“देव त्यांना बुद्धी देवो’ – मुनगंटीवार

उंद्रालयावरून मुनगंटीवार यांचा एकनाथ खडसेंना टोला
शिर्डी – भाजपाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरूवारी उंदीर घोटाळा उघडकीस करून सरकारला पिंजऱ्यात पकडले होते. मंत्रालयातील 3 लाख 19 हजार 400 उंदीर सात दिवसात कसे मारण्यात आले, असा सवाल विधानसभेत केला होता. त्याला प्रत्युत्तर देत “देव त्यांना सुबुद्धी देवो’, असे म्हणत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खडसेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

शिर्डी येथे बोलताना सुधिर मुनगंटीवार यांनी उंदीर घोटाळ्यावरून खडसे यांचे कान पिळले आहेत. ते म्हणाले की, फाईल कुरतडू नये म्हणून काही औषधे ठेवली जातात. तीन-साडेतीन लाख टॅबेलट, ज्याची किंमत एक-दीड रुपये आहे, अशा सुमारे चार लाखाच्या टॅबलेट मंत्रालयात ठेवण्यात आल्या. त्यातून अर्थ असा काढण्यात आला की, जिथे एक टॅबलेट ठेवली, ती उंदराने खाल्लीच पाहिजे आणि तो मेलाच पाहिजे. आपल्याकडे कसा असा अर्थ काढला जातो, “भगवान साईबाबा त्यांना सदबुद्धी देवो…’

जिथे टॅबलेट ठेवल्या, तेवढे उंदीर मेले, तेवढ्या उंदरांची विल्हेवाट कशी लावली, तासाला किती उंदीर मेले, जेवढ्या टॅबलेट ठेवल्या तेवढे उंदीर मेलेच पाहिजे, असा अर्थ काढणे चुकीचे आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

आधीच जनतेचा व्यवस्थेवर विश्वास कमी झाला आहे, त्यातच असे वक्तव्य करुन विश्वास अजून कमी करु नका असा, अप्रत्यक्ष सल्ला मुनगंटीवार यांनी खडसेंना दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)