देवेन शहा खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविणार ?

पुणे- बांधकाम व्यावसायिक देवेन शहा खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. देवेन शहा यांची 13 जानेवारी 2018 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. डेक्कन पोलिसांनी शिताफीने तपास करत आजवर मुख्य आरोपीसह सात जणांना अटक केली आहे. तसेच यातील मुख्य आरोपीवर मोक्‍काही लावण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आजवर डेक्कन पोलीस करत होते. मात्र, आता हा तपास पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेकडे सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते यांनी सांगितले, पोलीस आयुक्तालयाकडून गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्याचा कोणताही आदेश आला नाही. यामुळे या प्रकरणाचा तपास अजूनही आम्हीच करत आहोत. देवेन शहा खून प्रकरणात आजवर नितीन दशरथ दांगट (36, रा.वारजे), समीर रजनीकांत सदावर्ते (42,रा.कोथरुड), रवींद्र सदाशिव चोरगे (40, रा. सिंहगड रस्ता), राहुल चंद्रकांत शिवतरे (45, रा. वडगाव बुद्रुक), सुरेंद्र शामकेर पाल (36, रा.ठाणे), सुनील उर्फ सोनू मदनलालजी राठोड (34, रा. राजेंद्रनगर, मध्यप्रदेश), शंकर लक्ष्मण नवले (50, रा. चंदननगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. देवेन शहा खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी डेक्कन पोलिसांसह गुन्हे शाखेची 6 तथके तयार करण्यात आली होती.

मात्र, गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात डेक्‍कन पोलिसांना यश आले. यानंतर केलेल्या तपासात आजवर सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान यातील आरोपी सुनील उर्फ सोनू मदनलालजी राठोड याच्याविरुध्द बांधकाम व्यावसायिकांना धमकावणे व खंडणी उकळणाऱ्या अनेक तक्रारी दाखल आहेत. ही बाब लक्षात घेऊन त्याला मोक्‍का लावण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)