देवेंद्र फडणवीस, शरद पवारांसह स्व. यशवंतरावांना मान्यवरांची आदरांजली

कराड :  स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन करताना शरद पवार, श्रीनिवास पाटील, खा. उदयनराजे भोसले, कल्लाप्पाण्णा आवाडे, आ. बाळासाहेब पाटील व मान्यवर. 

कराड, दि. 25 (प्रतिनिधी) – नव महाराष्ट्राचे शिल्पकार, ज्येष्ठ नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी येथील प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन केले.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी रविवारी सकाळी शरद पवार, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खा. उदयनराजे भोसले, काँग्रेसचे माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, सारंग पाटील, देवराज पाटील, सुधीर धुमाळ, बाळासाहेब सोळस्कर, स्व. यशवंतराव चव्हाण यांचे पुतणे अशोकराव चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकार्‍यांनी अभिवादन केले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर, आ. आनंदराव पाटील, आ. विश्वजीत कदम, मनोहर शिंदे यांच्यासह काँग्रेसच्या मान्यवरांनी समाधीस्थळी आदरांजली वाहिली. सकाळी साडे नऊच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार, पणन मंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, ना. शेखर चरेगावकर, ना. डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, आ. नरेंद्र पाटील, शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई, नगरसेवक विनायक पावसकर, विद्या पावसकर, विजय वाटेगावकर, कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले. मुंबईहून आणण्यात आलेल्या यशवंत समता ज्योतीचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)