देवेंद्र फडणवीस यांना आम्हीच राजकारणात आणले- नितीन गडकरी

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्हीच राजकारणात आणल्याचे सांगितले. नागपुरात गोर बंजारा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांचे वडील राजकारणात होते, मात्र त्यांनी मुलाला राजकारणात आणलं नाही. आम्ही त्यांच्या वडिलांना विनंती करुन राजकारणात आणलं. देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांच्या नेतृत्वात मी काम केलं आहे. माझ्या मुलाला तिकीट द्या असं त्यांनी मला कधीच सांगितलं नव्हतं. मी आणि छोटू भय्या नारकर असे आम्ही दोघे त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना देवेंद्र फडणवीस यांना महापालिकेचं तिकीट द्यायचं आहे, त्यामुळे त्यांना राजकारणात पाठवा अशी विनंती केली. यावर त्यांनी आपल्याला काहीच अडचण नसून देवेंद्र फडणवीस यांना विचारायला सांगितलं.” असे त्यांनी सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)