देवेंद्र फडणवीस जरा स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर निघा- अजित पवार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार दुष्काळमुक्तीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करीत असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.

अजित पवार म्हणाले, २०० तालुक्यांत गंभीर पाणीटंचाई. २०,००० गावांना दुष्काळाची झळ. १३ जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती. मराठवाड्याची स्थिती चिंताजनक! तरीही दुष्काळमुक्तीचं स्वप्न साकार करत असल्याचा दावा मुख्यमंत्री करत आहेत. देवेंद्र फडणवीस जरा स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर निघा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)