देवेंद्र फडणवीसजी रस्ते दुरूस्ती करण्यासाठीचा निधी कुठे गेला ? -सुप्रिया सुळे

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा #SelfieWithPotholes या मोहिमेला सुरवात केली आहे. गेल्या वर्षी सुप्रिया सुळे यांनी बोपदेव घाट येथे खड्यांसोबत सेल्फी काढला होता. आज एकावर्षांनंतर रस्त्यांची तीच परिस्थिती असून सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, रस्ते राज्याच्या विकासाच्या जीवनवाहिन्या असतात. त्या खड्ड्यांमुळे कोंडल्या गेल्या आहेत. याचा जनतेला त्रास सहन करावा लागतोय. शिवाय खड्ड्यांमुळे अपघातांना आमंत्रण मिळतेय. देवेंद्र फडणवीस खड्डे बुजवून रस्ते दुरूस्ती करण्यासाठीचा निधी गेला कुठे? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

वर्षापुर्वी #SelfieWithPotholes हि मोहिम सुरु करताना बोपदेव घाट येथे मी सेल्फी काढून रस्त्याची दुरवस्था दाखवून दिली होती. आज एक वर्षानंतर देखील या ठिकाणची परिस्थिती जैसे थे आहे. रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यासाठी रोज नवी डेडलाईन मिळते पण काम काही होत नाही, असे देखील सुप्रिया यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)