देवेंद्रजी ! औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव कधी करणार? – संजय राऊत

मुंबई: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव कधी करणार?, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

भाजपचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी फैजाबाद जिल्ह्याचे अयोध्या असे नामांतर केले तर अयोध्येतील प्रस्तावित विमानतळास प्रभू श्रीराम आणि वैद्यकीय महाविद्यालयाला दशरथ असे नाव देण्याची घोषणा केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विटरव्दारे “योगी अदितयनाथ यांनी फैजाबादचे अयोध्या केले. अलाहाबादचे प्रयाग तिर्थ केले. मुख्यमंत्री देवेंद्रजी औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव कधी करणार?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

शिवसेनेने सातत्याने ही मागणी लावून धरली आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांना संपूर्ण जिल्ह्याचे नाव बदलता येत असेल तर मग महाराष्ट्रात शहरांची नावे का बदलता येऊ शकत नाही, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1060127619205738496

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)