देवाची भविष्यवाणी ऐकण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

श्रीक्षेत्र वीर लाखो भाविकांची गर्दी

परिंचे- श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे आज पंचमीनिमित्त देवाची भाकणूक (भविष्यवाणी) व गजे गोपाळ घालण्यास सुरुवात झाली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत भविष्यवाणी सांगण्यात आली. यावेळी मृगाचे पाणी दोन खंडात पडेल, बाजरीचे पीक चांगले येणार असून मगा दोन खंडात व उत्तर पूर्वा चार खंडात पडून शेतकरी समाधानी होईल. हत्तीचे पाणी तीन खंडात पडणार असून एका खंडात पाऊस आलागेला असे होईल. गुरा-ढोरांचे, शेळ्या-मेंढ्यांचे आरोग्य चांगले राहणार आहे. एकरास दीडशें उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. वेळेत पेरणी करणाऱ्या शेतकऱ्याला सव्वास सव्वाशे मिळणार असल्याचे या भविष्यवाणीत सांगण्यात आली.
पंचमीनिमित्त पहाटे श्रीनाथ म्हस्कोबांची महापूजा करण्यात करून मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी सहा वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. फुलांनी सजवलेल्या मानाच्या काठ्या व पालख्या दुपारी बारा वाजता देऊळवाड्यात आणण्यात आल्या. कोडीत, कन्हेरी, थोपटेवाडी, सोनवडी, राजेवाडी, कसबा पेठ (पुणे) सर्व पालख्यामध्ये उत्सवमूर्ती ठेवण्यात आल्या. देवाची धुपारती झाल्यावर छबिन्याला सुरुवात झाली. एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर देवाचे मानकरी तात्याबा बुरुंगले यांनी भविष्यवाणी सांगायला सुरुवात केली.
छबीन्यासह पालख्यांनी तीन मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून छबिण्याची सांगता करण्यात आली. भाकणुकीसाठी मंदिरामध्ये समस्त ग्रामस्थ, मानकरी, सालकरी, दागिनदार, मंडळी मोठ्या प्रमाणात हजर होती. देवस्थानच्या वतीने यात्रेतील कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडी, ज्यादा कर्मचारी, मंदिर परिसर स्वच्छता, पिण्याचे पाणी, चोख पोलीस बंदोबस्त, ग्रामसुरक्षा रक्षक, पोलीस मित्र संघटना दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मदत करीत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)