देवस्थान समिती घोटाळ्यावर 

शासनाचे लक्ष वेधणार – राजेश क्षीरसागर 

कोल्हापूर –
महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनास सोमवारपासून प्रारंभ होत आहे. या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती घोटाळा, रुग्णालयांकडून नागरिकांची होणारी लुट, सर्किट बेंच, रखडलेले छ. शाहू स्मारक, रखडलेली थेट पाईपलाईन योजना आणि त्यातील गैरकारभार आदी सुमारे 50 तारांकित प्रश्न, 4 लक्षवेधी, अर्धातास सूचना अधिवेशनामध्ये उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर शहरातील टोल, एलबीटी, थेट पाईपलाईन, तीर्थक्षेत्र आराखड्यासारखे ज्वलंत प्रश्न आपल्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागले आहेत. शहरात आजही अनेक विकासकामे आणि प्रश्न प्रलंबित असून शहरातील ज्वलंत प्रश्नावर विविध आयुधांच्या माधाम्यातून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या विषयांबाबत संबंधित मंत्री महोदायांशी बैठक आयोजित करून समस्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)