देवस्थान जमीनप्रश्नी आंदोलन; अखिल भारतीय किसान सभेचा निर्णय

कोल्हापूर – राज्यातील देवस्थान समितीच्या जमिनी कुळांच्या नावावर झाल्या पाहिजेत, कुळांच्या वारसांच्या नोंदी सात-बारा उताऱ्यावर झाल्या पाहिजे. या  मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर एप्रिलमध्ये मोर्चा काढण्याचा निर्धार अखिल भारतीय किसान सभेच्या बैठकीत करण्यात आला. टॉऊन हॉल येथे जिल्हा सेक्रेटरी सुभाष निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.

यावेळी बोलताना  सुभाष निकम म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नाशिक-मुंबई हा महामोर्चा झाला. या मोर्चाने राज्य सरकारला जाग आली. त्यामुळे देवस्थान इनाम वर्ग तीनच्या जमिनीबाबत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली. ही समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एप्रिलमध्ये याचा अहवाल देणार आहे.तरीही, शासनाला एक प्रकारे जाग आणण्यासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विविध मार्गांनी आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला किसान सभेचे जिल्हा कार्यकारिणीचे शिष्टमंडळ भेट देऊन चर्चा करणार आहे.

राज्यातील देवस्थान समितीतील ज्या जमिनी आहेत, त्या कसदार व कुळांच्या नावावर कराव्यात. त्याचबरोबर कसदार व कुळांच्या वारसांच्या नोंदी झाल्या पाहिजेत. बैठकीस अप्पासो परीट, अमोल नाईक, गणेश कुंभार, राजेंद्र आळवेकर, विनायक डंके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)