देवळालीत मॅरेथॉन स्पर्धा थाटात संपन्न

राहुरी फॅक्‍टरी – देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2018 जनजागृतीनिमित्त महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत खुल्या व 18 वर्षांच्या आतील गटातून कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवून बाजी मारली. तर, इतर गटात अहमदनगरच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय, तृतीय स्थानावर क्रमांक पटकावून स्पर्धेत यश संपादित करून नगर जिल्ह्याचा मान अबाधित ठेवला.

महामॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ माजी आमदार व शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, तर बक्षीस वितरण नगराध्यक्ष सत्यजित कदम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष जगन्नाथ चव्हाण, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, प्रीती कदम, विजय बेंगाळे, अनिल पाटील, देवळाली नगरसेवक अण्णासाहेब चोथे, बाळासाहेब खुरूद, गनीभाई शेख, सचिन ढूस, आदिनाथ कराळे, संजय बर्डे, शहाजी कदम, नगरसेविका संगीता चव्हाण, बेबी मुसमाडे, अंजली कदम, ऊर्मिला शेटे, सुजाता कदम, नंदा बनकर, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, भारत शेटे, अमोल कदम, दिगंबर पंडित, संदीप कदम, भाऊसाहेब वाळुंज, नामदेव चव्हाण, भाऊसाहेब गडाख, प्रभाकर महांकाळ, सचिन शेटे, अतुल कदम, सतीश वने, रवींद्र दळवी, मंगेश ढूस, कार्यालयीन अधीक्षक सोफिया बागल, आदी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)