देवले येथे पूरक पोषण आहार सप्ताहाचे आयोजन

कार्ला – एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत पूरक पोषण आहार सप्ताहाची सुरवात देवले मावळ येथे करण्यात आली. 0 ते 6 वयोगटातील लाभार्थी, गरोदर स्त्रिया, स्तन्दा माता, किशोरवयीन मुलींसाठी पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, आहार व आरोग्य शिक्षण इत्यादी सेवा पुरवण्यात येणार आहे.

एक सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या काळात हा पोषण आहार उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुवर्णा कुर्ले यांनी या वेळी उपस्थित माता भगिनींना आरोग्याबाबत काळजी कशी घ्यावी, कुपोषण, बालमृत्यू, उपजत मृत्यू, स्वच्छता अभियान व एकात्मिक बाल विकास योजनेची माहिती दिली.

पोषक आहार पाककृती स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते. यामध्ये प्रथम संगीता महेंद्र आंबेकर, द्वितीय ज्योती संदीप आंबेकर, तृतीय शारदा श्रीरंग आंबेकर यांनी अनुक्रमे पारितोषिक मिळवले. या वेळी देवले गावचे सरंपच महेंद्र आंबेकर, समन्वयक सुवर्णा कुर्ले, उपसरपंच मंगल आंबेकर सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला मंडळ सदस्या यांच्यासह गावातील अनेक महिला उपस्थित होत्या.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)