देवराज पाटील वाढदिवसा निमित्त कार्यक्रम

उंब्रज, दि. 29 (वार्ताहर) – पाल, ता. कराड येथील श्री खंडोबा देवस्थान प्रमुख मानकरी तथा कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष देवराज (दादा) पाटील यांचा शनिवार, दि. 1 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा होत असून वाढदिवसानिमित्त पाल येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन व श्री म्हाळसाकांत गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. 30 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता लावणी सम्राज्ञी माया पुणेकर, साधना पुणेकर व प्रियांका पुजारी यांचा बहारदार लावणीचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार, दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता देवराज दादा पाटील हे श्री खंडोबा देवाचे दर्शन घेवून अभिषेक करतील. त्यानंतर सकाळी 8 वाजता श्री म्हाळसाकांत व्यापारी मंडळातर्फे वहीतुला व खाऊ वाटप तर सकाळी 9 वाजता ग्रामपंचाय व ग्रामस्थ हरपळवाडी यांचे वतीने वहीतुला, सकाळी 10 वाजता पेंबर जिल्हा परिषद शाळा येथे भेट व वही व खाऊ वाटप, 10.50 वाजता ग्रामपंचायत पाल यांच्या 14 वित्त आयोग निधीतून बेघरवस्ती येथील डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन, 11 वाजता पाल विकास सोसायटी व रयत विकास सोसायटीतर्फे पाल व पेंबर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता जय शंभो नेहरु युवा मंडळातर्फे केक कापणे, तद्नंतर कराड उत्तर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष तथा माजी सभापती देवराज पाटील यांचा पाल जिल्हा परिषद गट व ग्रामस्थ यांच्यातर्फे भव्य नागरी सत्कार व म्हाळसाकांत गौरव पुरस्कार प्रदान समारंभ आमदार शशिकांत शिंदे व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते व आ. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी मार्तंड देवस्थानतर्फे जाहीर झालेला श्री म्हाळसाकांत गौरव पुरस्कार पोलीस सब इन्स्पेक्टर पुणे सौ. अलका शहाजी काळभोर (जाधव) यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास पालसह परिसरातील नागरीकांनी उपस्थित राहावे, असे अवाहन मार्तंड देवस्थान ट्रस्ट, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)