देवराज पाटील यांचा वाढदिवस उत्साहात

उंब्रज – पाल ता. कराड येथील श्री खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी, कराड पंचायत समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादीचे कराड उत्तरचे अध्यक्ष देवराजदादा पाटील यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात झाला. त्यांच्या वाढदिनी अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून आणि दुरध्वनीव्दारे शुभेच्छा दिल्या.

देवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त म्हाळसाकांत व्यापारी मंडळ, रयत व विकास सोसायटी, हरपाळवाडी ग्रामस्थ यांच्यातर्फे वही तुला करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल क्‍लासरूमचे उद्‌घाटन करण्यात आले. व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व वहीवाटप करण्यात आले.

-Ads-

देवराज पाटील यांना माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, डॉ. संजय डी. पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, खा. उदयनराजे भोसले, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. सतेज उर्फ बंटी पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, विधान परीषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आ. मकरंद पाटील, आ. शंभूराज देसाई, अविनाश मोहिते, सत्यजितसिंह पाटणकर, राजेश पाटील, ऋृतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी दुरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

सायंकाळी जय शंभो नेहरु युवा मंडळातर्फे केक कापूण व पाल जिल्हा परिषद गट व ग्रामस्थांतर्फे सभापती देवराज पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते म्हाळसाकांत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, बाळासाहेब सोळसकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सभापती फरीदा इनामदार, मानसिंगराव जगदाळे, चंद्रकांत जाधव, सोमनाथ जाधव, अजितराव पाटील-चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा जाधव, विनिता पलंगे, पंचायत समिती सदस्या वनिता माने, सुषमा नागे, सह्याद्रीच्या उपाध्यक्षा लक्ष्मी गायकवाड, यांच्यासह परिसरातील अनेक ग्रामपंचारतीचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रत्यक भेटून शुभेच्छा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)