देवदर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर घाला 

टायर फुटून गाडी डोहात बुडाली : तीन चिमुकलींसह 5 जणींचा जागीच मृत्यू 

कोल्हापूर –
गणपतीपुळे येथुन देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्या मिरज येथील भाविकांवर आज काळाने घाला घातला. कोल्हापुर-पन्हाळा मार्गावर गाडीचा टायर फुटुन गाडी रेडे डोहात पलटी झाली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन बालके जखमी आहेत. हा भीषण अपघात मध्यरात्री दोनच्या सुमारास झाला. मृतांमध्ये पाचही महिला असुन त्यातील चार जणी एकाच कुटुंबातील आहेत.

अश्विनी सुनील तांदळे (26), अनिषा सुनील तांदळे (14), जान्हवी सुनील तांदळे (7), बेबी सुनील तांदळे (3) आणि धनश्री शशिकांत माने (7, सर्व रा. दत्त कॉलनी मालगाव रोड मिरज) अशी मृतांची नावे आहेत. तर आदर्श नितीन तांदळे (5), ओम सुनील तांदळे (वय5) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

-Ads-

अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिक, करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव मोहीम सुरू केली. सुरवातीला चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर तीन वर्षांच्या बेबी तांदळेचा मृतदेह उशिरा आपत्ती व्यवस्थापनाच्या हाती लागला. दोघांची प्रकृती गंभीर असून जखमींना उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)