देवघरात भैरवनाथ महाराज पालखी मिरवणुकीचा सोहळा

लोणावळा, (वार्ताहर) – कुलस्वामिनी एकवीरा देवीच्या लोणावळ्याजवळील माहेरघरात पालखी मिरवणूक सोहळा पारंपरिक नृत्य व वाद्याच्या निनादात मोठ्या उत्साहात पार पडला. यावर्षी भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

श्री काळभैरवनाथ ट्रस्ट देवघर व काळभैरवनाथ बांधकाम समितीने सोहळ्यांचे नियोजन केले होते. दरवर्षी चैत्र षष्ठीला देवघरात आई एकवीराचा भाऊ काळभैरवनाथ महाराज यांचा पालखी सोहळा असतो. कोकणातून आई एकवीराच्या यात्रेकरिता येणाऱ्या पालख्या षष्ठीला आईच्या माहेरघरात देवीचा भाऊ काळभैरवनाथ महाराजांच्या भेटीला येतात व आई एकवीरा व काळभैरवानाथ भेट घडवून पालख्यांची मंदिर प्रदक्षिणा व मिरवणूक होते. दुपारनंतर कोकणातील पालख्या मंदिर परिसरात जमायला सुरुवात झाली व पाहता-पाहता मंदिर परिसर भाविकांनी दुमदुमून गेला होता.

श्री काळभैरवनाथ ट्रस्ट व काळभैरवनाथ बांधकाम समिती देवघरच्या वतीने पहाटे सहा वाजता काळभैरवांना अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले केले. बांधकाम समितीचे अध्यक्ष मारुती देशमुख, सचिव अशोक कौदरे, सल्लागार महादु देशमुख, उपाध्यक्ष किसन आहेर, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गोविंद कौदरे, रवीराज कौदरे, काळूराम देशमुख, अशोक रोकडे, धोंडू शिंदे, शंकर ढाकोळ, अनंता शिंदे, धोंडू आहेर, सुरेश शिर्के, यशवंत आहेर, मधुकर पवार यावेळी उपस्थित होते. कोकणातील पायी पालख्या व भाविकांनी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग गजबजला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)