देवगाव येथे नवविवाहित दाम्पत्याचे श्रमदान

नगर – तालुक्‍यातील देवगांव येथील मिनीनाथ वामन दीपाली वामन या नवविवाहित दाम्पत्याने मातृ दिनानिमित्त देवगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात भूमातेचे पूजन करून वृक्षारोपन व श्रमदान केले. तसेच विकास कामासाठी एक हजार रुपयांची देणगी देवून समाजापुढे नवा आदर्श घालून दिला आहे.
देवगाव येथे नवजीवन ग्रामोदय प्रतिष्ठान संचालित, कमिन्स इंडिया व नाबार्डच्या आर्थिक सहकार्याने डब्ल्यू. डी. एफ. अंतर्गत मॉडेल व्हिलेज प्रोजेक्‍ट चे काम नुकतेच सुरू झाले आहे. तेथील गायरानात बांधबंदिस्ती साठी या नवदांपत्याने श्रमदान केले. तसेच गावच्या श्रमदान कामासाठी एक हजार रुपयांची देणगी देखील दिली. यावेळी नवजीवन चे संस्थापक राजेंद्र पवार, नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वामन सर, जेष्ठ नागरिक राधाजी शिंदे, सचिन वामन, प्रदीप वामन, शंतनु कुंडलिक वामन, गणेश वामन, शिवाजी वामन, मंजुळाबाई शिंदे, कौसाबाई शिंदे, कमल शिंदे, विजया शिंदे, रेशमा शिंदे, ऋषिकेश वामन, ओंकार शिंदे, मंगेश वामन, अशोक शिंदे, ज्ञानेश्‍वर वामन, मच्छीन्द्र शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आपले देवगाव मॉडेल व्हिलेज करण्यासाठी सर्वानी राजकारण व गट तट बाजूला ठेवून एकमेकांच्या सहकार्याने काम करावे. श्रमदानात सहकुटूंब सहभाग नोंदवावा. या उपक्रमासाठी नगर कृषी उत्पन्न बाजार समिती व आपण स्वतः वैयक्तीकरित्या आवश्‍यक ते सर्व सहकार्य करू अशी ग्वाही नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास शिंदे यांनी दिली. यावेळी श्रमदानासाठी पाच हजार रुपयांची देणगी दिली. तर सरपंच विठ्ठल वामन यांनी दोन हजार पाचशे एक रुपयांची देणगी दिली.
देवगाव येथे कमिन्स इंडिया फौंडेशन आणि नाबार्ड बॅंकेच्या आर्थिक सहकार्याने नवजीवन प्रतिष्ठान या संस्थेमार्फत एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत देवगाव येथे पर्यावरण संवर्धन, सेंद्रिय शेती, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करून आपले गाव मॉडेल व्हिलेज करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंब श्रमदान करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून नवविवाहित दाम्पत्य मिनीनाथ वामन व दीपाली वामन यांनी विवाहबंधनात अडकल्या नंतर लगेचच बोहल्यावरून उतरून श्रमदान केले व ग्रामीण विकासास हातभार लावत एक नवा आदर्श घालवून दिला. त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. देवगाव येथे नवविवाहित दाम्पत्याचे श्रमदान
नगर,दि.17 (प्रतिनिधी) – तालुक्‍यातील देवगांव येथील मिनीनाथ वामन दीपाली वामन या नवविवाहित दाम्पत्याने मातृ दिनानिमित्त देवगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात भूमातेचे पूजन करून वृक्षारोपन व श्रमदान केले. तसेच विकास कामासाठी एक हजार रुपयांची देणगी देवून समाजापुढे नवा आदर्श घालून दिला आहे.
देवगाव येथे नवजीवन ग्रामोदय प्रतिष्ठान संचालित, कमिन्स इंडिया व नाबार्डच्या आर्थिक सहकार्याने डब्ल्यू. डी. एफ. अंतर्गत मॉडेल व्हिलेज प्रोजेक्‍ट चे काम नुकतेच सुरू झाले आहे. तेथील गायरानात बांधबंदिस्ती साठी या नवदांपत्याने श्रमदान केले. तसेच गावच्या श्रमदान कामासाठी एक हजार रुपयांची देणगी देखील दिली. यावेळी नवजीवन चे संस्थापक राजेंद्र पवार, नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वामन सर, जेष्ठ नागरिक राधाजी शिंदे, सचिन वामन, प्रदीप वामन, शंतनु कुंडलिक वामन, गणेश वामन, शिवाजी वामन, मंजुळाबाई शिंदे, कौसाबाई शिंदे, कमल शिंदे, विजया शिंदे, रेशमा शिंदे, ऋषिकेश वामन, ओंकार शिंदे, मंगेश वामन, अशोक शिंदे, ज्ञानेश्‍वर वामन, मच्छीन्द्र शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आपले देवगाव मॉडेल व्हिलेज करण्यासाठी सर्वानी राजकारण व गट तट बाजूला ठेवून एकमेकांच्या सहकार्याने काम करावे. श्रमदानात सहकुटूंब सहभाग नोंदवावा. या उपक्रमासाठी नगर कृषी उत्पन्न बाजार समिती व आपण स्वतः वैयक्तीकरित्या आवश्‍यक ते सर्व सहकार्य करू अशी ग्वाही नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास शिंदे यांनी दिली. यावेळी श्रमदानासाठी पाच हजार रुपयांची देणगी दिली. तर सरपंच विठ्ठल वामन यांनी दोन हजार पाचशे एक रुपयांची देणगी दिली.
देवगाव येथे कमिन्स इंडिया फौंडेशन आणि नाबार्ड बॅंकेच्या आर्थिक सहकार्याने नवजीवन प्रतिष्ठान या संस्थेमार्फत एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत देवगाव येथे पर्यावरण संवर्धन, सेंद्रिय शेती, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करून आपले गाव मॉडेल व्हिलेज करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंब श्रमदान करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून नवविवाहित दाम्पत्य मिनीनाथ वामन व दीपाली वामन यांनी विवाहबंधनात अडकल्या नंतर लगेचच बोहल्यावरून उतरून श्रमदान केले व ग्रामीण विकासास हातभार लावत एक नवा आदर्श घालवून दिला. त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)