देवगड दिंडीचे विशाल गणेश मंदिर येथे स्वागत

भास्करगिरी महाराज : देवावरील श्रद्धेने दु:खाचे निवारण
नगर  – पायी दिंडीमुळे सर्वत्र धार्मिकतेचे वातावरण तयार होत आहे. दिंडी
मार्गावरील धार्मिकस्थळांना भेटी देऊन या स्थळांची महती सर्वदूर पसरविण्याचा महत्त्वपूर्ण सहभाग हा वारकऱ्यांच्या रुपाने होत आहे. ज्या-ज्या ठिकाणी या दिंड्या जातात त्या ठिकाणची धार्मिकस्थळे, तेथील जागृत देवस्थान याची माहिती वारकऱ्यांनी मिळते तसेच ठिक ठिकाणच्या धार्मिक स्थळांची माहिती येथील भाविकांना होत असते. धर्माचरणाची ही देवाण-घेवाण झाल्याने सर्वत्र धार्मिकतेचे वातावरण निर्माण होऊन देवावरील श्रद्धा वाढीस लागण्यास मदत होते. त्यातून भाविकांच्या दु:खाचे निवारण होऊ शकते. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर जागृत देवस्थान असल्याने श्री विशालाचे दर्शनाने वारकरीही धन्य होत
आहेत, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनी
केले.
श्रीक्षेत्र देवगड ते पंढरपूर पायी दिंडीचे शहराचे ग्रामदैवत विशाल गणेश मंदिर येथे आगमन झाल्यानंतर दिंडी प्रमुख भास्करगिरी महाराज यांचे स्वागत देवस्थानचे पुजारी संगमनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडित खरपुडे, सचिव अशोक कानडे, बाबासाहेब सुडके, पांडुरंग नन्नवरे, हरिश्‍चंद्र गिरमे, बापूसाहेब एकाडे, डॉ.संभाजी मिस्कीन, विष्णूपंत म्हस्के, नट्टू आंबेकर, एस. पी. कुलट, विजय क्षीरसागर, गणेश
कोल्हे, अशोक कापरे, बाबासाहेब जाधव, कैलास खरपुडे, भाऊसाहेब पुंड आदी
उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)