देलवडीत वाळू ठेक्‍याच्या वर्चस्वातून गाडीची मोडतोड

यवत- देलवडी (ता. दौंड) येथे 5 ऑगस्टला स्वप्निल ऊर्फ पिंटु ज्ञानदेव शेलार या तरुणाचा खून वाळूच्या ठेक्‍याच्या वर्चस्वातून झाला होता. या प्रकरणातील फिर्यादी विशाल ज्ञानदेव शेलार यांच्या चारचाकी गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी सोमवारी (दि. 25) मध्यरात्रीच्या सुमारास कोयत्याने तोडफोड करीत गाडीचे नुकसान केले आहे. घटनास्थळी एक मासिक जमिनीवर पडलेले आढळले असून त्यामध्ये एक जिवंत काडतुस आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळू ठेक्‍याच्या वर्चस्वातून स्वप्निल ऊर्फ पिंटु ज्ञानदेव शेलार या तरुणाचा धारदार हत्याराने वार करीत आणि डोक्‍यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला होता. या खुनातील फिर्यादी विशाल ज्ञानदेव शेलार हे आपल्या कुटुंबासह झोपले होते. आज (दि. 25 ) रोजी मध्यरात्री 2:45 वाजण्याच्या सुमारास बाहेर या, बाहेर या असा घराबाहेरून आवाज आला. त्यावेळी घरातील मंडळी बाहेर आल्यावर एक दुचाकी व एक काळ्या रंगाची मोटार वेगात एकेरीवाडी ते देलवडी या रस्त्याने निघून गेली. यावेळी कंपाऊंडमध्ये लावलेल्या गाडीची मागील काच आणि उजव्या बाजूची मागील काच अज्ञात आरोपींनी धारदार हत्याराने फोडली. कारजवळ एक मासिक जमिनीवर पडलेले दिसले, त्यामध्ये एक जिवंत काडतुस आढळून आले आहे.
याप्रकरणी बापूराव नारायण शेलार (वय 45, रा. देलवडी, शेलार-वाघोले वस्ती ता. दौंड) यांनी अज्ञात आरोपी विरोधात यवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यवत पोलिसांनी या तोडफोड प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास यवत पोलिस करीत आहेत. .

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)