दक्षता अधिकारी परशुराम पांडा यांचा कर्मचाऱ्यांशी संवाद

पुणे: देना बॅंकेचे मुख्य व्हिजिलन्स अधिकारी परशुराम पांडा यांनी नुकतीच पुणे झोनला भेट दिली. त्यांनी बॅंकेच्या नारायण पेठ येथील कर्मचारी प्रशिक्षण केंद्रात बॅंकेच्या निवडक शाखांचे व्यवस्थापक आणि अंचल कार्यालयातील कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.

त्यावेळी त्यांनी प्रतिबंधात्मक दक्षता या विषयाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच गैरव्यवहार टाळण्यासाठी प्रत्येक कर्जप्रकरण हाताळताना प्रत्येक पातळीवर योग्य ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
त्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना एनपीएची वसुली आणि कासा ठेवी वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले. याप्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने महेंद्रसिंग रोहेरिया (झेडएम) आणि विजया राठोड (डीझेडएम) यांनी बॅंकेत आणि देशातही भ्रष्टाचारमुक्त वातावरण राखण्याचे वचन दिले. कर्जवसुली वाढविणे व त्रुटीहीन पद्धतीने कर्ज वितरणास आगामी काळात प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)