देणी दिल्याशिवाय 2019-20 च्या हंगामाला परवाना नाही

साखर आयुक्त ः बारामती, दौंड आणि व्यंकटेशकडे 57 कोटी 46 लाखांची बाकी

दौंड- पुणे जिल्ह्यातील बारामती ऍग्रो लिमिटेड, दौंड शुगर लिमिटेड आणि व्यंकटेश कृपा या तीन खासगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची सर्व प्रकारची देणी पूर्ण दिल्याशिवाय त्यांना 2018-19 च्या गळीत हंगामासाठीचा गाळप परवाना दिला जाणार नाही, अशा प्रकारचा स्पष्ट आदेश साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी दिल्यानंतर रयत क्रांती संघटनेचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे. तिन्ही कारखान्यांनी शेतकऱ्यांचे एकूण 57 कोटी 46 लाख रुपये थकविल्याने त्या रकमेच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते.
दौंड मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बाहेर सरकारच्या ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य भानुदास शिंदे आणि रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सर्फराज शेख यांच्या नेतृत्वाखाली 26 सप्टेंबर रोजी थकित रकमेच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. संघटनेचे नीलेश देवकर, गणेश साळुंखे, अभिमन्यू शिंदे, ज्ञानदेव आहेर, पांडुरंग फराटे, राधा शेलार आदी आंदोलनात सहभागी झाले होते. उपोषणादरम्यान महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सीमा पवार अुाण शिरूर तालुका अध्यक्षा छाया सकट यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले होते.
दरम्यान राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी 28 सप्टेंबर रोजी पुणे येथे एका बैठकीत निर्देश दिल्यानंतर राज्याच्या साखर आयुक्तांनी तिन्ही कारखान्यांनी शेतकऱ्यांची सर्व प्रकारची देणी दिल्याशिवाय त्यांना 2018-19 च्या गळीत हंगामासाठीचा गाळप परवाना दिला जाणार नाही, अशा प्रकारचा आदेश दिला. या आदेशाची प्रत दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर भाजप किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे यांच्या हस्ते जलपान करून उपोषण स्थगित करण्यात आले.
महसूल विभागणी सूत्राच्या (आरएसएफ) नियमातील 70:30 किंवा 75:25 या सूत्रांच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठी साखर संघ, वेस्टर्न इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, ऊस नियंत्रण मंडळातील शेतकरी आणि साखर कारखान्यांचे प्रत्येकी एक प्रतिनिधी, साखर संचालक यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय साखर आयुक्तालयाने घेतला आहे.

  • महसूल विभागणी सूत्रानुसार (आरएसएफ) 2016-17 या हंगामात शेतकऱ्यांना देय रकमेपैकी बारामती ऍग्रो लिमिटेडने 20 कोटी 98 लाख 64 हजार रुपये, दौंड शुगर लिमिटेडने 18 कोटी 58 लाख 14 हजार रुपये आणि व्यंकटेश कृपा कारखान्याने 17 कोटी 89 लाख 42 हजार रुपये, असे एकूण 57 कोटी 46 लाख 20 हजार रुपये थकविले आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)