देखावे मांडण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग अंतीम टप्प्यात

पिंपरी – लाडक्‍या गणरायाच्या स्वागतासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग अंतीम टप्प्यात आहे. काही तासांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवामुळे गणेशभक्‍तांमध्ये कमालीचा उत्साह आहे. सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते देखील देखाव्यातील मूर्ती मांडवात आणणे, त्यांची जागा निश्‍चित करणे यात मग्न आहेत.

गणेशोत्सवातील प्रमुख आर्कषण असते देखावे. ऐतिहासिक व पौराणिक देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते. ते तयार करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते महिन्यापासून झटत असतात. काही वर्षांपासून अनेक मंडळे ही पहिल्याच दिवशी आपला देखावा पूर्ण करुन नागरिकांना पाहण्यासाठी खुला करतात. चिंचवडमधील गांधी पेठ तालीम मंडळ, एसकेएफ कंपनी गणेशोत्सव मंडळ, मोहन नगरमधील श्री साईनाथ तरूण मंडळ अशा काही मंडळांचा यात समावेश होतो. त्यांनी ही परंपरा गेले अनेक वर्षांपासून जपली आहे. याशिवाय शहराच्या मध्यवस्तीतील काही गणेश मंडळे आहेत. ती सुध्दा पहिल्याच दिवशी देखावे पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करतात.

ज्या गणेश मंडळांचे देखावे अद्याप अपूर्ण आहेत, ते कार्यकर्ते वेगाने काम करीत आहेत. मूर्तींची मांडणी, हालचालींसाठी वीजजोड, त्यांचा पेहराव, प्रकाश व ध्वनी यंत्रणा सेट करून देखाव्याची ट्रायल घेणे या कामांत कार्यकर्ते मग्न आहेत.

यंदा आमचे मंडळ 35 वे वर्ष साजरे करीत आहे. अनेक वर्षांपासून मंडळ सामाजिक विषयावर जीवंत देखावा सादर करते. याशिवाय पहिल्याच दिवशी हा देखावा गणेशभक्‍तांना पाहण्यासाठी खुला केला जातो. श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या देखावा स्पर्धेत मंडळाने पारितोषिक मिळवले आहे.
                                                                       तुषार नामदे
                                अध्यक्ष, श्री साईनाथ तरूण मंडळ, मोहननगर.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)