देखावा पाहण्यासाठी गर्दी

 

पुणे – गौरी व घरगुती गणेश विसर्जनानंतर शहरात गणेशोत्सव देखावा पाहण्यासाठी सातव्या दिवसांपासून शहरात गर्दी होऊ लागली आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक, पौराणिक देखावे पाहण्यासाठी गुरूवारी रात्री गर्दी झाली होती. पावसाने उघडीप दिल्याने लोक आता देखावा पाहण्यासाठी घराबाहेर पडू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गुरूवारी रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी असल्याने गणपती देखावा पाहण्यासाठी गणेशक्‍तांची गर्दी झाली होती.

 

गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी शहरात संततधार पाऊस होता. दोन दिवसांपासून पाऊस थांबला असून, आता पावसाने विश्रांती घेतली. त्याचप्रमाणे शुक्रवारी सातव्या दिवशी घरगुती गणेश विसर्जन व गौरीचे विसर्जन झाल्यानंतर शहरात देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मंडळाने देखावे पाहण्यासाठी चोख व्यवस्था केली होती. त्यामुळे देखावे पाहून नागरिक पुढील देखाव्या पाहण्यासाठी मार्गस्थ होत असल्याचे पाहावयास मिळाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने यंदा रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ब्रह्मणस्पती मंदिर साकारले आहे. त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख मंडळांनी ऐतिहासक व पौराणिक देखाव्यावर भर दिला. काही मंडळांनी केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. गणेशोत्सव पाहण्यासाठी लोक घराबाहेर पडत आहेत. शनिवारी आणि रविवारीही राज्यातील विविध भागातील नागरिक देखावे पाहण्यासाठी येतात. त्यामुळे देखाव्यासाठी जास्त गर्दी होणार असल्याची परिस्थिती दिसून येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)