देऊळगावराजे- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गावांमध्ये महाआरती आणि श्रीरामाचा जयघोष शनिवारी (दि. 24) सायंकाळी करण्यात आला. शिवसेनेच्या वतीने बहुसंख्य गावांमध्ये श्रीरामाच्या महाआरतींचे आयोजन शरदचंद्र सूर्यवंशी, शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. देऊळगाव राजे येथे युवा सेनेचे जिल्हा शिवाजी काळे, शाखाप्रमुख बापू गायकवाड, उपसरपंच नितीन दगडे, हभप गौतम महाराज वाळके, हभप पासलकर महाराज, उपतालुकाप्रमुख मोहन चोरमले, विभाग प्रमुख अशोक फडतरे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी आपापल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात महाआरतीचे आयोजन केले होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा