देऊळगाव परिसरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

देऊळगांव राजे- देऊळगांव राजेसह, शिरापूर, वडगाव दरेकर, पेडगाव, आलेगाव, हिंगणीबेर्डी, काळेवाडी, बोरिबेल, खोरवडी (ता. दौंड) या भागात सोमवारी (दि. 28) रात्री आठच्या सुमारास मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. देऊळगांव राजे येथे 36 मि. मी.पावसाची नोंद झाली आहे. पाऊस कमी पण वारे जोराचे होते. यामुळे परिसारात धुळीचा कोट तयार झाला होता. अनेक झाडे उन्मळून पडली. अचानक आलेल्या या वाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची तारांबळ उडालीण दौंड-सिद्धटेक रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे रस्ता रात्री 12 वाजेपर्यंत बंद होता; पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आतिश मोहिते यांनी तत्परता दाखवून रस्त्यावर पडलेली मोठी झाडे जेसेबीच्या आणि कट्टरच्या साहाय्याने तोडून वाहतुकीसाठी रात्री रस्ता खुला करण्यात आला. अनेक ठिकाणी घरांचे, शेडचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा पिकाचे आंबे गळून पडले आहेत, तर तरकारी, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. डाळिंब, लिंबू या फळझाडांचे मोठे नुकसान झाले आहे. आडसाली झालेला ऊस जमीनदोस्त झाला असून, भुईमूग, कलिंगड, खरबूज या पिकांना या पावसाचा जोरदार फटका बसला आहे.
याबरोबरच अनेक ठिकाणी लाइटचे खांब पडल्यामुळे देऊळगांव राजे सबस्टेशनमधून सोमवारी (दि. 28) रात्री 8 वाजल्यापासून वीज पुरवठा बंक करण्यात आला.
एकूणच या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने एकच मागणी होत आहे की झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करुण नुकसान भरपाई मिळावी.

  • गांव फिडरची लाइट मंगळवारी संध्याकाळपर्यंत दुरुस्त होतील, काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, शेती पंपाची लाइट सुरू होण्यास थोडा वेळ लागेल, त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.
    – युवराज जाधव, महावितरणचे अधिकारी
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)