देऊळगावराजे परिसरातील वीजपुरवठा सुरळीत

देऊळगावराजे – दौंड तालुक्‍यात सोमवारी (दि.28) रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. त्यामध्ये महावितरण कंपनीच्या ठिकठिकाणी विद्युत तारा तुटल्या. वादळी वाऱ्यामुळे झाड, झाडांच्या फांद्या पडून विद्युत खांब कोसळले तर, काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे देऊळगावराजे, वडगाव दरेकर, पेडगाव, शिरापूर, बोरिबेल, कालेवाडी मलठण, राजेगाव, खानोटा, हिंगणी बेर्दी, नायगांव आदी गावचा विजपुरवठा खंडित झाला होता. पंरुतु महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिक्षम करून मंगळवारी (दि.29) संध्याकाळपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत केला. यामध्ये देऊळगावराजेचे कनिष्ठ अभियंता युवराज जाधव, वायरमन नितिन मेंगांवडे, दादा मेंगांवडे, आदींनी सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)