देऊळगावराजे- देऊळगावराजे ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवसापर्यंत 11 जागांसाठी एकूण 59 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील सरपंचपदासाठी 6 अर्ज दाखल झाले असून, सदस्य पदासाठी 53 अर्ज दाखल झाले आहेत. 26 सप्टेंबरला ही निवडणूक होणार असून, अर्ज सादर करण्याचा आज (दि. 11) शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली होती. बुधवारी (दि. 12) आलेल्या अर्जांची छाननी होणार आहे. निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी भानुदास येडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)