देऊळगावराजेतील अंगणवाडी केंद्रात पोषक वडी वाटप

देऊळगाव राजे -पुणे जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत पोषक वडी वाटप कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते अंगणवाडी केंद्र देऊळगाव राजे येथे पार पडला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, ताराबाई देवकाते, प्रभावती पोळ कुसुम गिरमकर, अनिता बुऱ्हाडे, अमित गिरमकर विष्णू सूर्यवंशी, भरत गिरमकर, जनार्धन आवचार, मचिंद्र निगडे, कुंदा भोसले, संगीता ढमाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी मनोगत व्यक्त करताना जगदाळे यांनी पोषक वडीतून मिळणारे फायदे आणि तोट्यासंदर्भात सूचना करण्याचे आवाहन उपस्थित महिला आणि मातांना केले. त्यानुसार पुढील वर्षीच्या कार्यक्रमात योग्य तो बदल करू, असा मनोदयही व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रियांका जोग यांनी केले. तर अमित गिरमकर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)