सुजाता टिकेकर  
पावशेर कांदा पावशेर तुपात भाजून एकवीस दिवस खाल्ल्याने क्षय रोगाची खराब झालली फुफ्फुसे सुढ बनतात व फुफ्फुसातील जंतू नष्ट होऊन फुफ्फुसातील कीड नष्ट होते. उडदाची चाळीस तोळे डाळ घेऊन ती कांद्याच्या रसात भिजवावी व मग उन्हात सुकवावी. वीस दिवसपर्यंत लागोपाठ उडदाची डाळ कांद्याच्या रसात भिजवावी व मग उन्हात सुकवावी. नंतर या डाळीचे पीठ बनवून काचेच्या बरणीत भरावे. सकाळी त्यातील दोन तोळे पीठ घेऊन दुधात घालून प्यावे. रोजच्या आहारात दुधा-तुपाचे सेवन चालू ठेवावे. गरम मसाला वर्ज्य करावा. चार-पाच आठवडे हा प्रयोग केल्याने शरीर चांगले सुढ बनते.

बहु औषधी गुणकारी कांदा…(भाग 1)

वीर्यवर्धक
पांढऱ्या कांद्याचा रस, मध, आल्याचा रस आणि तूप एक-एक तोळा घेऊन ते सर्व जिन्नस एकत्र करुन एकवीस दिवस रोज सकाळी प्यायल्याने पुरुषत्व प्राप्त होते. अर्धौ तोळा कांद्याचा रस, पाच तोळे गाईचे तूप, अर्धौ तोळा मध आणि अर्धौ तोळा आल्याचा रस एकत्र करुन प्यायल्याने सौंदर्य, शक्ती व उत्साह वाढतो तसेच रात्री थकवा येऊन पायाला पेटके येण्याचे किंवा पाय दुखण्याचे थांबते. सहा मास कांद्याचा रस, तीन मासे तूप आणि तीन मासे मध एकत्र करुन रोज सकाळ संध्याकाळी घेऊन त्यावर साखर घातलेले गरम दूध प्यायल्याने वीर्यवृद्धी होते. हा प्रयोग एक दोन महिने करावा. त्यामुळे उर:क्षतमध्ये (छातीवर झालेल्या जखमेत) फायदा होतो.

कांद्याचा रस वीस तोळे व मध एक तोळा हे एकत्र करून त्याचे एकवीस दिवस चाटण करावे त्यामुहे वीर्यवृद्धी होते.
कांदा शिजवून खाल्लयाने जीर्णज्वरात फायदा होतो. कांद्याचे तुकडे करुन ते पाण्यात घालून उकळून प्यायल्याने कफ दूर होतो. पांढरा कांदा बारीक वाटून, त्यात साखर आणि दही घालून खाल्याने झोप चांगली येते.
कांदा खाल्याने गळ्यात व तोंडात चिकटपणा रहात नाही. तोंड स्वच्छ होते. दात दुधासारखे शुभ्र रहातात, स्मरणशक्ती वाढते व दुर्बल झालेले स्नायू मजबूत बनतात. जिरे आणि सैंधव घालून जेवताना कांद्याची कोशिंबीर खाल्लयाने गळा स्वच्छ राहतो, गळ्यात साचलेला कफ दूर होतो आणि पोटातील विषारी घटक नष्ट होतात.
तुपात भाजलेला कांदा शिऱ्याबरोबर खाल्ल्याने आजारपणाने आलेला अशक्तपणा दूर होऊन शरीरात लवकर शक्ती येते.

कांदा गरम राखेत दाबून ठेवून, तो रोज सकाळी खाल्ल्याने आतडी मजबूत होतात, शौचशुद्धी होते व शक्ती येते.
कांद्यांचा रस व कारल्याचा रस एकत्र करुन प्यायल्याने जुनाट अजीर्णाचा विकार दूर होतो. एक तोळा कांद्याचा रस, अर्धौ तोळा आल्याचा रस व एक रतीभर हिंग घेवून त्यात थोडे मीठ व पाणी घालून प्यायल्याने अपचन दूर होतो. आवश्‍यकता भासल्यास हे मिश्रण दोन तासांनी पुन्हा द्यावे. पोट फुगले असता कांद्याच्या रसात भाजलेला हिंग व मीठ घालून पाजल्याने फायदा होतो. पांढरा कांदा, गूळ आणि हळद एकत्र करुन सकाळ-संध्याकाळ खाल्याने कावीळ बरी होते. एक मोठा कांदा ओल्या फडक्‍यात गुंडाळून कोळशाच्या निखाऱ्यावर भाजून घ्यावा. एक रात्र तो तसाच ठेवावा. सकाळी अनशापोटी दोन-दोन रती नवसागर व हळद घालून खाल्याने वाढलेली प्लीहा बरी होते. कांदा आणि गूळ मुलांना रोज खायला घातल्याने त्यांची उंची वाढते. एक लिटर पाणी उकळून खाली उतरावे. त्यात पाच तोळे कांद्याचा कीस घालून पाचदहा मिनिटे तसेच ठेवून द्यावे. थंड झाल्यावर गाळून त्यातून एक चमचा पाणी घ्यावे व त्यात पाच थेंब मध घालून लहान मुलांना प्यायला दिल्याने चांगली झोप येते.

एक चमचा कांद्याचा रस दिल्याने अन्न घेणाऱ्या लहान मुलांना झालेले लहान कृमी मरुन जातात व पुन्हा होत नाहीत. तसेच अपचनही दूर होते. पांढरा कांदा दाबून मुलांना हुंगवल्याने लहान मुलांच्या आचकी येणे, हातपाय ताणले जाणे या विकारात फायदा होतो. कांदा पाट्यावर बारीक वाटून दोन-चार वेळा पाण्याने धुऊन त्यात दही घालून दिवसातून तीन वेळा खाऊ घातल्याने रक्ताचे जुलाब बंद होतात. कांद्याचा दोन-दोन तोळे रस एक-एक तासाने त्यात थोडे पाणी घालून प्यायल्याने अपचनाने होणाऱ्या उलट्यामध्ये व जुलाबांत फायदा होतो.

एक तोळा कांद्याच्या रसात अर्धा तोळा साखर आणि पाव तोळे तूप घालून प्यायल्याने व रात्री पोट साफ ठेवण्यासाठी इसबगोल घेतल्याने मूळव्याध बरे होते. आहारात रोज कांदा खाल्ल्यामुळे शरीराच्या बारीकसारीक तक्रारी दूर होतात. डोळे तेजस्वी होतात. मुळव्याधीसारखे उष्णताजन्य विकार बरे व्हायला मदत होते. प्रत्येकाने आपल्या आहारात कांद्याचा समावेश करावा त्याचा वास तोंडाला येतो म्हणून जेवणानंतर बडीशेप खावी पण कांदा खाणे सोडू नये. कांद्याचे आयुर्वेदिय उपयोग जाणल्यामुळेच कांदा वाळवूनही तो साठवण्याकडे तसेच कांद्याची पावडर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)