दृष्टीक्षेप: शांघाय को-ऑपरेशन ऑर्ग आणि भारत 

मंदार चौधरी 

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ताजिकिस्तान या आशियातल्या महत्त्वाच्या असणाऱ्या देशाला नुकतीच भेट दिली. ताजिकिस्तान हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन छोट्या राष्ट्रांइतकाच महत्त्वाचा आहे. मध्य आशियात असल्याने आणि अफगाणिस्तान, चीन, किरगीस्तान आणि उझबेकिस्तान या देशांनी वेढलेला असल्यामुळे दहशतवाद निर्मूलनाबाबतीतल्या लढ्यात हा देश भारताला किती सहाय्यक ठरू शकतो, याची जाणीव भारतीय परराष्ट्र खात्याला चांगलीच आहे. 

भारताच्या परराष्ट्र व्यवहार सुषमा स्वराज दोन दिवस ताजिकिस्तान या देशाच्या दौऱ्यावर होत्या. जितका लहान देश तितकं त्याचं द्विस्तरीय महत्त्व महाशक्तींच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. कारण आंतरराष्ट्रीय मंचावर जर वादाचा प्रश्‍न आला तर आपली तळातली बाजू भक्कमपणे मांडायला सुपर पॉवर असणाऱ्या देशांनासुद्धा अशी लहान लहान राष्ट्रे उपयोगाची असतात.
स्वराज यांनी तिथे दोन दिवसांच्या आपल्या दौऱ्यात उपस्थित सर्व राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमोर दहशतवाद या विषयावर भारताची बाजू मांडली. कारण देश जगाच्या पटलावर छोटा असो वा मोठा असो, दहशतवादाचा धोका त्याला असतोच. एकेकाळी असाच तोरा मिरवणाऱ्याला अमेरिकेला 9/11 च्या हल्ल्यातून जावं लागलं आहे. जिथे महासत्तेची अशी अवस्था आहे; तिथे भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या लहान असणाऱ्या देशाचं कोण ऐकतो? आणि त्यामुळेच एकमेकांशी मिळून मिसळून राहिले तर आंतरराष्ट्रीय संघबांधणी फायद्याची ठरू शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वराज यांनी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या व्यासपीठावर आपले मत मांडले. शांघाय संघटना ही एक युरेशियन (युरोपियन आणि आशियाई) राजकीय, आर्थिक आणि लष्कर विषयक संघटना आहे. तिची स्थापना चीन, रशिया, कझाकस्तान, किरगिस्तान आणि ताजिकिस्तान यांच्या नेत्यांनी संयुक्तरित्या 2001 साली केली. ताजिकिस्तान हा या संघटनेचा एक संस्थापक सदस्यच असल्याने यावर्षीची बैठक त्याच देशात होणे याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वराज यांनी मत मांडले तेव्हा समोर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आंतरराष्ट्रीय धोरणावर पाक अप्रत्यक्षरित्या प्रभाव पाडत असतो. त्यामुळे अशा संमिलित व्यासपीठावर जर पाकिस्तानला त्याची खरी बाजू दाखविण्यात यश येत असेल तर हा भारताच्या दृष्टीने एक मोठा विजय असतो.

पाकिस्तानमध्ये आताच नवीन सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे सरकार बदलले की देशाच्या नीती सुद्धा बदलत असतात आणि शांघाय परिषदेत भारताचा सहभाग अजून नवीन आहे. मागच्याच वर्षी भारताला यात प्रवेश करण्यात यश आला. ही परिषद आशियाखंडातील देशांसाठी नवीन संधीची पर्वणी आहे. फक्त प्रत्येक देश या बदलाला किती गंभीररित्या घेतो ते ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. अनेक विविध क्षेत्रात याच्या मार्फत सहकार्य केले जाणार आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर सुरक्षा संबंधित बाबी, सीमांतर्गत वाद, लष्करी कारवाया आणि यात सर्वात महत्त्वाच्या सध्याच्या घडीला जो मुद्दा आहे. तो म्हणजे… “दहशतवादाचे निर्मूलन’ यातले सदस्य राष्ट्रांपैकी चार ते पाच देश हे मुस्लिम बहुल देश आहेत. आणि दोन ते तीन देशांची सीमा तर अफगाण व पाकिस्तानशी जोडलेली आहे. ही सर्व राष्ट्रे सेक्‍युलर राष्ट्रे होत. पण महत्त्वाची बाब येथे अशी नमूद करावीशी वाटते की पाकिस्तान जरी वरवरून आपली दहशतवादाविरुद्ध बाजू मांडत असला तरी विविध संघटनांना (आतंकवादी) याच देशाने कसा आणि किती थरापर्यंत थारा दिलाय आणि देतोय हे सर्व जग बघतंय. त्यामुळे पाकिस्तानच्या भूमिकेविषयी आपण दृढ मत विचारात घेऊ शकत नाही.

या व्यासपीठावरून सुषमा स्वराज यांनी स्पष्ट मत मांडत पाकिस्तानला एक प्रकारे अप्रत्यक्ष तंबीच दिली की, “प्रत्येक देशाने त्याच्या त्याच्या परीनं दहशतवाद संपवण्यासाठी सर्वोच्च प्रयत्न करायचे आहेत.’ हा टोला नेमका उचापत्या पाकसाठी होता. हे जगाला कळायला वेळ लागला नाही. भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही सभासद राष्ट्रे मागच्याच वर्षी यात अंतर्भूत झालेली असल्याने दोघे नवखे आहेत. याच्याआधी दोघांना या संघटनेत मागच्या वर्षांपर्यंत निरीक्षक म्हणून फक्त दर्जा होता. एकीकडे या संघटनेवर चीनचा प्रभाव असणारी संघटना म्हणून टीका केली जाते तर दुसरीकडे अमेरिकेचा मध्य अशियातला वाढता दबाव रोखणे, हे उद्दिष्ट अधिकृत घोषणांमध्येच समाविष्ट आहे.

संघटनेची स्थापना करताना चीनच्या मनात हे द्वंद्व चालू होते की आपली सीमा आपण सुरक्षित करून ठेवायला हवी आणि मग याच विचारातून शांघाय परिषदेचा जन्म झाला. हळूहळू सभासद राष्ट्रे वाढत गेली. आशियातले सर्वच महत्त्वाचे देश नैसर्गिक साधन संपत्तीच्या दृष्टीने जगातल्या 160 पैकी बव्हंशी आघाडीवर आहे. मग ते खनिजतेल असो वा नैसर्गिक वायू! दुसरीकडे चीन हा या सर्वांवर अधिराज्य गाजवण्यासाठी आणि भारताला डावलण्यासाठी “चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (उझएउ) बांधत आहे. आणखी “वन बेल्ट वन रोड’ सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. चीन आणि पाकिस्तान या दोघांचा एक संयुक्त पैलू आहे तो म्हणजे भारत द्वेष आणि त्यामुळेच स्वराज आणि ओबोर (जलीे) सुद्धा बोलताना हे अधोरेखित केलं की आमचं भौगोलिक सार्वभौमित्व धोक्‍यात येता कामा नये. एक प्रकारे सरळ चीनलाच तंबी होती ही.

शांघाय परिषदेची बैठक जेव्हा ही होते तेव्हा प्रादेशिक मुद्यांवर चर्चा होते. याही वेळेला सिरीया, ईराक, खीळी अशा महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाली. सुषमाजींनी या व्यासपीठावरून मांडलेलं आणखी महत्त्वाचं मत म्हणजे अफगाणिस्तानने त्यांची धोरणं स्वतः ठरवावीत. पाकिस्तानचा त्यात हात असता कामा नये जे अफगाण लोकांना वाटेल तेच अफगाणिस्तानमध्ये घडलं पाहिजे असा आग्रह जगभरातून आहे. पाकिस्तानचे “अफगाणिस्तान धोरण’ ही आता मध्य आशियातील देशांसाठी एक नवीन डोकेदुखी बनली आहे.

त्यामुळे स्वराज यांचा या परिषदेतला सहभाग नक्कीच महत्त्वाचा आहे. यामुळे एक गोष्टीला डावलण्यात भारताला यश आलं म्हणजे झालं आणि ती म्हणजे, “भारत आणि पाकमध्ये काही आतंकवादी घटना घडल्यावरच होणारी
नाममात्र चर्चा.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)