दूध व अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांना आता जन्मठेप – बापट

मुंबई – दूध व अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांना आता जन्मठेपेची शिक्षा होणार आहे. तसेच अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी अधिवेशनात लवकरच कायदा करणार असल्याचीही घोषणा केली.

विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान काँग्रेसचे सदस्य भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गिरीश बापट यांनी भेसळीचा गुन्हा अजामीनपात्र ठरणार असल्याची घोषणा केली. याआधी हा गुन्हा अदखलपात्र होता व या गुन्ह्याची शिक्षा फक्त सहा महिन्यांपर्यंत होती. आरोपींना जामीनही मिळत होता. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नव्हता. मात्र यापुढे गुन्ह्याची तीव्रता पाहून सहा महिन्यांपासून ते जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंतची शिक्षा सुनावण्यात येईल, असेही बापट यांनी स्पष्ट केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)