दूध व्यवसाय अडचणींच्या फेऱ्यात

श्रीकृष्ण पादिर
उत्पादक अडचणीत, दूध संघही तोट्यात, ग्राहकांना मात्र काहीच दिलासा नाही

पुणे-दूध उत्पादनात जगात आघाडीवर असलेल्या आपल्याच भारत देशात दुग्ध व्यवसाय कमालीचा अडचणीत आल्याचे चित्र आहे. त्यातूनही राज्यतील स्थिती अधिकच बिकट दिसून येते. अगदी उत्पादकांपासून ते दूध संघांसमोर अडचणींचा डोंगर असून, यातून बाहेर पडण्यासाठी सरकारने वेळीच हस्तक्षेप करण्याची गरज आहे. घसरलेला दूध खरेदी दर उत्पादकांसाठी मारक ठरत असून, आंतरराष्ट्रीय बाजाराचा दूध संघांना फटका बसत आहे. गेली काही वर्षांपासून होणारे दूध पावडरचे अतिरिक्त उत्पादन यामुळे घसरलेले दर पाहता वाढीव दुधाचे करायचे काय? असा प्रश्‍न खासगीसह सहकारी दूध संघापुढे “आ’ वासून उभा आहे. परिणामी दूध संघही काही प्रमाणात तोट्यात आहेत. याच कारणामुळे सामान्य ग्राहकांना मात्र दूध महागच मिळत आहे. देशाचा विचार करता मागील अवघ्या तीन वर्षांत दूध उत्पादनात तब्बल 20 टक्के इतकी भरघोस वाढ झाली असल्याने याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होत असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून तरी दिसते.

दूध व्यवसाय अडचणींच्या फेऱ्यात 

राज्यात सध्या दरवर्षी 1 कोटी 34 लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. यावर्षी 20 लाख लिटर उत्पादन अधिक आहे. असे असले तरी राज्यातील दूध, दूध पावडर, बटर निर्मिती उद्योगासंदर्भातील अडचणी दूर व्हाव्यात व शेतकऱ्यांना दुधाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी राज्य शासन दूध खरेदीबाबत नवे धोरण आणणार आहे.
-महादेव जानकर, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री

दूधदराबाबत समिती नेमली आहे, बैठकाही सुरू आहेत. कमी दराबाबत सहकारी दूध संघांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यावर त्यांनी त्यांच्या आर्थिक अडचणी मांडल्या आहेत. वास्तविक, संघ आणि शेतकरी या दोघांचाही विचार आम्हाला करावा लागेल. लवकरच याबाबत काही तरी तोडगा निघेल.
-आर. आर. जाधव, आयुक्‍त दुग्धविकास विभाग

वर्ष उत्पादन टनांमध्ये
2010-11 12.18 कोटी
2011-12 12.89 कोटी
2012-13 13.24 कोटी
2013-14 13.77 कोटी
2014-15 14.63 कोटी
2015-16 15.55 कोटी
2016-17 16.37 कोटी
2017-18 16.54 कोटी

सरासरी 15 लिटर दूध देणाऱ्या गाईचा खर्च
सर्व प्रकारचे पशुखाद्य-200
चारा-50
मनुष्यबळ-100
लाईट बिल-15
बॅंक व्याज-30
एकूण खर्च-395 रुपये

उत्पादनाचा ताळमेळ
1. जुन्या दराप्रमाणे 27 रुपये प्रतिलिटर होणारी रक्कम  405 रुपये
या दराप्रमाणे होणारा दररोजचा फायदा- 10 रुपये प्रतिदिन, प्रतिगाय
2. कमी केलेल्या दराप्रमाणे म्हणजे 20 रुपये लिटरप्रमाणे होणारी रक्कम  300 रुपये
याप्रमाणे होणारा दररोजचा तोटा  145 रुपये प्रतिदिन, प्रतिगाय


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)