दूध वितरकाच्या खून प्रकरणात आठजणांना पोलीस कोठडी

पुणे – बांधकामाबद्दल माहिती अधिकारात माहिती मागविण्यासाठी फार्म भरल्याच्या कारणाने कोयत्याने वार करून दूध वितरकाचा खून केल्याप्रकरणात आठजणांना चतु:शृंगी पोलिसांना अटक केली. त्या आठजणांना 8 नोव्हेंवरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

गजेंद्र उर्फ दादा तुळशीराम मोरे (वय 36), श्रीपाद राधाकृष्ण मोरे (वय 32), सागर दिनकर पवळ (वय 24), दत्ता दिनकर पवळ (वय 28), आकाश सिद्धार्थ कांबळे (वय 24), प्रतिक सुनील कदम (वय 19), अमोल महादेव चोरमले (वय 28 सर्वजण, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, गणेशखिंड रस्ता) आणि आकाश आनंदा केदारी (वय 26 रा . आंबेडकरनगर, औंध) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. तर, आणखी एकावर गुन्हा दाखल आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रोहित अशोक जुनवणे (वय 28, रा. औंध) यांचा गुरुवारी (दि. 1) सकाळी औंध येथील कस्तुरबा वसाहतीत कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. याबाबत त्यांचा भाऊ आकाश यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या प्रकरणात आठजणांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील एक कोयता जप्त करण्यात आला. आणखी कोयते वापरले असून, ते जप्त करण्यासाठी, आणखी कोण साथीदार आहेत का, याच्या शोधासाठी आठजणांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील चैत्राली पणशीकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने आठ जणांना पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)