मंचर: येथील विकास दूध संस्थेने दूध व्यवसायाबरोबरच पतसंस्था सुरु करुन संस्थेच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध व्यवसायासाठी कर्जपुरवठा करुन स्व:ताची पत निर्माण केली आहे आहे. दूध संस्था आर्थिक अडचणीत असताना सरकारने बाजारभाव वाढविले. पुन्हा बाजारभाव कमी केले आहेत. त्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत. दूध दर वाढीसाठी सरकारच्या विरोधात आवाज उठवु असा इशारा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिला.
मंचर येथील विकास दूध संस्थेने उभारण्यात आलेल्या नुतन सभागृहाचे उद्घाटन दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, ज्येष्ठ नेते कांता बाणखेले, मंचर शांतता समितीचे उपाध्यक्ष प्रविण मोरडे, बाजार समितीचे माजी संचालक अल्लु इनामदार, ह. भ. प. संतोष महाराज बढेकर, माजी सरपंच कैलास गांजाळे, लक्ष्मण गांजाळे, संस्थेचे अध्यक्ष बाबाजी मुळे, संचालक पंडीत निघोट, बाळासाहेब थोरात, प्रभाकर लोढे, मारुती जुन्नरे, पंढरीनाथ गांजाळे, निलेश गांजाळे, संस्थेचे सचिव भाऊसाहेब शेवाळे, सहसचिव विकास केदार, संतोष मिंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, मंचर येथील विकास दूध संस्थचे केवळ 124 सभासद आहेत. संस्थेचे सर्व संचालक मंडळ, युवक वर्ग, दूध संस्था गवळी यांचा समन्वय असल्यामुळे विकास दूध संस्थेने प्रगतीची गरुड भरारी घेतली आहे. तोट्यात चाललेल्या सहकारी संस्थांनी विकास दूध संस्थेच्या प्रगतीच्या आलेखाची माहिती घ्यावी. संस्थेचे अध्यक्ष बाबाजी मुळे यांनी वळसे पाटील यांचा सत्कार केला. यावेळी बाळासाहेब बाणखेले यांचे भाषण झाले. कायक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर लोंढे यांनी केले तर आभार लक्ष्मण गांजाळे यांनी मानले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा