दूध दराबाबत शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवावी

कॅप्टन जाधव यांचे प्रतिपादन

उंब्रज – जिल्ह्यातील सहकारी तसेच खासगी दूध संघाकडून शेतकऱ्यांना अद्यापही वाढीव दर दिला जात नसून शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे. जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघाकडून दूधाला देण्यात आलेले दरपत्रक मागवून घ्यावे व 25 रुपये पेक्षा कमी दर देणाऱ्या संस्थावर कारवाई व्हावी व वाढीव दराची आत्तापर्यंतची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या संदर्भातील लेखी निवेदन सातारा जिल्ह्याचे दुग्धविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

-Ads-

उंब्रज, ता. कराड येथील कॅंप्टन इंद्रजीत जाधव यांच्या आर्मी हाऊस येथे दुध उत्पादक शेतकरी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. यावेळी कृष्णत जाधव, धनाजी जाधव, शैलेश यादव, सुशांत जाधव, तानाजी कोळेकर, लालासो पवार, विजय काशिद, सचिन घाडगे, सुरेश जाधव, नंदकुमार पाटील, नंदकुमार पवार व परिसरातील दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, 31 जानेवारी पर्यंत दूध दर वाढीला मुदतवाढ मिळाली आहे. परंतु सातारा जिल्ह्यातील दूध संस्थानी आता नवीन दर पत्रकानुसार दूधाला दर दिलेला नाही. इतर जिल्ह्यातील दूध संघाकडून तेथील शेतकऱ्यांना दर दिला जात असताना आपल्या जिल्ह्यातील संस्थावर संबंधितांचे नियंत्रण नाही. त्यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी पुन्हा 29 रोजी आंदोलन करणार आहे. नुकत्याच झालेल्या दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी 19 जुलै रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ या प्रतिच्या दूधाकरिता 1 ऑगस्ट ते 30 ऑक्‍टोंबर पर्यत 25 रुपये प्रती लिटर असा दर जाहीर करण्यात आला.

त्यानंतर 1 नोव्हेंबर ते 31 जानेवारी या कालावधीसाठी तोच दर नियमित करण्यात आला आहे. तसेच याबाबत सरकारी सूचना झाल्या असतानाही सातारा जिल्ह्यातील दूध संघांनी पुन्हा मनमानी कारभार सुरु केला असून दूध उत्पादकास 3.5 फॅट, 8.5 एसएनएफ दूधास आज मितीला 18 ते 22 असा दर दिला आहे.

जो की 25 रुपये बंधनकारक आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील व संघाकडून दर पत्रकाची मागणी करुन घ्यावी आणि सर्व दूध संघांना, दुध उत्पादकांना 19 जुलै 2018 रोजी जाहीर केल्याप्रमाणे दर द्यावयाच्या सूचना कराव्यात. अन्यथा पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सातारा जिल्ह्यात निर्माण होऊ शकतो. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)