दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 1 रुपया बोनस

यवत- पारगाव (ता. दौंड) येथील रेणुकादेवी सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी सणानिमित्त प्रतिलिटर एक रुपयाप्रमाणे 6 लाख 12 हजार 500 रुपये बोनस वाटप करण्यात आला, तर सेवकांना 15 टक्के बोनस देण्यात आला. यामध्ये बोनस म्हणून 19 हजार 980 रुपये याप्रमाणे बोनस देण्यात आला. दरवर्षी प्रमाणे संस्थेला जास्त दूध पुरवठा करणाऱ्या पहिल्या अकारा दूध उत्पादकांना स्टॅंडचे फॅन, ट्रॉफी, शाल श्रीफळ देऊन उपस्थितांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी पिंपरी-चिंचवडचे उद्योगपती विकास ताकवणे, माजी सरपंच अरुण बोत्रे, दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संभाजी ताकवणे, भीमा पाटसचे संचालक तुकाराम ताकवणे, उपसरपंच सोमनाथ ताकवणे, शरद ताकवणे, संजय ताकवणे, सुनील शेळके, रामचंद्र रणदिवे, दत्तात्रय ताकवणे, रेणुकादेवी सहकारी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन आणि दौंड तालुका कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आत्माराम उर्फ पोपटभाई ताकवणे, उपाध्यक्ष किसन जगदाळे, तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ, आदी मान्यवर आणि दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)